मुंबईतून शेकडो भाविक अयोध्येला रवाना   

मुंबई : मुंबईतून शेकडो रामभक्‍त रेल्वेतूून अयोध्येकडे मंगळवारी रवाना झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. भाजपने भक्‍तांसाठी खास रेल्वेगाडीची व्यवस्था केली होती. 
 
अयोध्येत भव्य राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. त्यानंतर रामाचे दर्शन घेण्यासाठी लाखोेच्या संख्येने भाविक देशभरातून अयोध्येकडे रवाना झाले असून, आणखी होत आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील भाविकांना रामाचे दर्शन घेता यावे, यासाठी भाजपने व्यवस्था केली. रामभक्‍तांनी भरलेली रेल्वेगाडी अयोध्येकडे काल रवाना करण्यात आली. तत्पूर्वी रामाची आरती करण्यात आली. तेथे मंदिराची प्रतिकृती ठेवली होती. जय श्री रामच्या घोषणा देत भाविक अयोध्येकडे रवाना झाले. या कार्यक्रमामुळे रेल्वेस्थानक परिसर राममय झाला होता. 
 

 

Related Articles