माझ्या वक्‍तव्याचा चुकीचा अर्थ काढला : अजित पवार   

मुंबई : काही जणांना ’ध’ चा ’मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज नागरिकांना मी महत्त्व देत नाही, माझ्या बारामती येथील  वक्‍तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर पुन्हा टीका केली आहे. 
 
बारामती येथील कार्यक्रमात अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता सांगितले होते की, काही जण डोळ्यात पाणी आणून माझी शेवटची निवडणूक असेल, असेे भावनिक आवाहन करतील. त्या आवाहनाला भुलू नका. शेवटची निवडणूक पण कोणती काय माहीत, असे म्हटले होते.  लोकसभेत मी उभ्या केलेल्या उमेदवाराला निवडून द्या. अन्यथा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत वेगळा विचार करावा लागेल, असे सांगितले होते. भावनिक आवाहनाला भुलू नका, या वक्‍तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. मी केवळ ज्येष्ठ नेत्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असे म्हणत होतो.  परंतु ’ध’ चा ’मा’ करायची काही जणांना सवयच असते. अशांना मी महत्त्व देत नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांचा रोख त्यांच्यावर टीका करणार्‍या जितेंद्र आव्हाड यांच्यावर होता. 
 

Related Articles