पश्‍चिम बंगालमध्ये ईडीची कारवाई   

कोलकाता : मनरेगा निधीच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसंदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पश्‍चिम बंगालमध्ये काही अधिकार्‍यांच्या निवासस्थानावर अनेक ठिकाणी एकाचवेळी झाडाझडती घेतली.
 
सॉल्ट लेकच्या आयए ब्लॉकमधील पश्‍चिम बंगाल सिव्हिल सर्व्हिसेस (डब्ल्यूबीसीएस) अधिकार्‍याच्या निवासस्थानाची ईडीच्या अधिकार्‍यांनी काल झडती घेतली. ते आधी हुगळी जिल्ह्यातील धनियाखली येथे बीडीओ म्हणून कार्यरत होते, असेही त्यांनी सांगितले. ईडीचे पथक जेव्हा अधिकार्‍याच्या घरी पोहोचले, त्यावेळी ते घरी उपस्थित नव्हते. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले. झारग्राम जिल्ह्यातील एका डब्ल्यूबीसीएस अधिकार्‍याच्या सरकारी निवासस्थानाचीही झडती सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. हुगळी जिल्ह्यातील चिनसुरा येथील एका व्यावसायिकाच्या घराची आणि कार्यालयाचीही झडती सुरू असल्याचे अधिकारी म्हणाले.
 

Related Articles