समान नागरी कायदा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक : धामी   

डेहराडून : समान नागरी कायदा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक असल्याचे उत्तराखंडाचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंगळवारी सांगितले.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी काल समान नागरी संहिता विधेयक सभागृहात मांडण्यात आले. त्यावेळी भाजपच्या आमदारांनी जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. हे विधेयक मंजूर झाल्यास देशात समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरेल. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तरांखड सरकारने हे विधेयक विधानसभेत आणले आहे. समान नागरी कायदा हा भाजपच्या अजेेंड्यांचा प्रमुख भाग आहे. कलम 370, राम मंदिराची घोषणा भाजपकडून सातत्याने देण्यात येत होती. 
 

विरोधकांकडून घोषणा

 
यावेळी विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणा दिल्या. या विधेयकात 392 तरतुदी आहेत. सुमारे 172 पानांचे वाचन करुन, तरतुदींवर सविस्तर मत मांडण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ देण्यात आला नाही, असा दावा काँग्रेसच्या आमदारांनी केला. , सरकारला चर्चेविना विधेयक मंजूर करायचे आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते यशपाल आर्य यांनी केली.  भाजपकडून विधानसभेच्या नियमांची आणि प्रक्रियेची अवहेलना केली जात आहे. धामी सरकार लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका आर्य यांनी केली.
 

जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

 
या विधेयकामुळे राज्यात जातीय तेढ निर्माण होऊ शकते, असे मत माजी मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते हरिष रावत यांनी व्यक्त केले. सत्ताधारी वर्गासाठी सरकार समान नागरी कायदा आणू पाहात आहे. 
 

Related Articles