E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
अयोध्येतील राम मंदिराची संकल्पपूर्ती,काशी, मथुरेतही मंदिर उभारण्याचा निर्धार
Samruddhi Dhayagude
07 Feb 2024
भय्याजी जोशी यांचे प्रतिपादन
पिंपरी : हजारो वर्षांच्या परिस्थितीनंतर देश बदलतोय, त्याची अनुभूती आपल्याला येतेय. जय श्रीरामचा नारा दिला जातोय. श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त 22 जानेवारीपासून देशभरात भक्तीची लाट आली आहे, ती यापुढेही कायम राहावी. अयोध्येत श्रीराम लल्लाचं मंदिर झालं. अद्याप काशी आणि मथुरेचं मंदिर व्हायचं आहे. याच मार्गाने पुढे जात काशी मथुरेतही मंदिर उभारणीचा आमचा संकल्प आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य भय्याजी जोशी यांनी येथे केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायकराव थोरात यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सोमवारी चिंचवड नाट्यगृहात त्यांचा अभीष्टचिंतन सोहळा झाला.
भय्याजी जोशी आणि संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते थोरात यांचा सत्कार करण्यात आला. प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडगावकर, प्रांत प्रचारक यशोधन वाळिंबे, कमल थोरात, आयोजक अमोल थोरात उपस्थित होते.
भय्याजी जोशी म्हणाले की, विनायकराव थोरात यांनी बालपणापासून संघकार्यात झोकून देत समर्पित भावनेने काम केले. त्यांच्यासारखे हजारो स्वयंसेवक आणि राष्ट्रभक्तांच्या कार्यामुळे आज देश बदलत आहे. मंदिर वही बनायेंगेचा नारा देत राम भक्तांनी बाबरी ढाचा हटवला. पाचशे वर्ष हृदयाला टोचणारा काटा दूर करून आदर्शवत प्रेरणास्थान निर्माण केले. देशात मंदिरांची कमतरता नाही. मात्र, अयोध्येतील श्रीराम मंदिर हे सर्वार्थाने राष्ट्र मंदिर आहे. समाजाचा सामूहिक आनंद, सामूहिक शक्ती निर्माण करण्याच्या प्रयत्नाचा तो एक भाग आहे.
त्या माध्यमातून देशाचं सातवं सोनेरी पान लिहिण्याचं भाग्य तुम्हा-आम्हाला मिळालं आहे. संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत विनायकरावांसारखे लाखो स्वयंसेवक संघाने घडविले. त्यामुळेच हिंदू राष्ट्र उभारणीत संघाचे आणि स्वयंसेवकांचे मोठे योगदान आहे. नानासाहेब जाधव म्हणाले की, शांतपणे, ध्येय ठेवून काम करणे, हे थोरात यांचे वैशिष्ट्य आहे. देशी गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यासाठी संघाकडून विश्वमंगल गोग्राम यात्रा काढण्यात आली. त्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. प्रास्ताविक अमोल थोरात , सूत्रसंचालन महेश देशपांडे यांनी केले. कावेरी मापारी यांनी आभार मानले.
सरसंघचालकांकडून अभीष्टचिंतन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी दुपारी निगडी-प्राधिकरणात विनायकराव थोरात यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि अभीष्टचिंतन केले. या कौटुंबिक समारंभात विनायकराव थोरात व त्यांच्या पत्नी कमल थोरात यांचा भागवतांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी भागवत यांनी थोरात कुटुंबीयांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. चिमुरड्यांमध्ये ते रमून गेले. मुलांना त्यांनी खाऊचे वाटप केले. . मुलांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी पालकांनी मुलांना आवश्यक धडे द्यावेत. तसेच राष्ट्रभक्तीचे संस्कार मुलांवर करावेत, असे मार्गदर्शनही भागवत यांनी केले.
Related
Articles
लसीच्या दोन डोसमध्ये एड्स नियंत्रणात येईल
04 Dec 2024
हवाई वाहतुकीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रणाली
08 Dec 2024
पुण्यातील थंडी गायब
05 Dec 2024
टोळक्याची दहशत, दोघांना अटक
08 Dec 2024
केरळमध्ये भीषण अपघातात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू
03 Dec 2024
लेबाननमध्ये हवाई हल्ले; ११ ठार
04 Dec 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
समाज परिवर्तनाची सकारात्मक चळवळ
2
आणखी दहा दिवस शेवगा खरेदी विसरा!
3
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उद्या पदवी प्रदान सोहळा
4
मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील
5
’संगीत स्वयंवर’नाट्यप्रयोग पुढील आठवड्यात
6
धुक्यातही रेल्वे सुसाट