संसारात तडजोडीची वृत्ती हवी   

अभिनेत्री सायली संजीवचा सल्ला
 
पिंपरी : कोणतीही गोष्ट तोडणं सोपं असतं; पण जोडणं अवघड असतं. हेच अवघड वाटणं अगदी सोपं करत नात्यांमधला गुंता वाढविण्याऐवजी तो जर सोडविता आला तर? या प्रश्नाचा शोध घेणारा अ‍ॅड. यशवंत जमादार हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माझ्या पिढीला रिप्रेझेंट करणारा हा चित्रपटाचा विषय आहे. आजच्या पिढीला प्रसिद्धीही हवी आहे आणि नातेही हवे आहे. आपल्या आई-वडिलांनी कशी अ‍ॅडजस्टमेंट केली याचा विचार करून संसार करणे गरजेचे असल्याचे मत अभिनेत्री सायली संजीव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
 
घटस्फोटाचा गुंता सोडविणारा अ‍ॅड. यशवंत जमादार हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे एस. के. प्रॉडक्शन्सची  ही निर्मिती  आहे. संजीवकुमार अग्रवाल हे सिनेमाचे निर्माते असून अनिकेत अग्रवाल आणि चंद्रकांत ठक्कर हे सहनिर्माते आहेत. तर चित्रपटाचं दिग्दर्शन रमेश साहेबराव चौधरी यांनी केलं आहे. संजय नवगिरे यांची कथा आणि पटकथा आहे. सिनेमाचे डीओपी आणि संकलक सिद्धेश मोरे आहेत. मंदार चोळकर यांनी सिनेमाची गीतं लिहिली असून अजित परब यांनी संगीत दिलं आहे. अमर लष्कर हे प्रोजेक्ट हेड आहेत. 22 जानेवारी रोजी सिनेमाचा मुहूर्त झाला असून सध्या पिंपरी-चिंचवडजवळ हिंजवडी. तसेच प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृह येथे  सिनेमाचं चित्रीकरण सुरू आहे.
 
अभिनेता मकरंद देशपांडे, ऋषिकेश जोशी, भारत गणेशपुरे, कैलास वाघमारे, अभिनेत्री सायली संजीव, विशाखा सुभेदार, प्रतीक्षा जाधव, शिवाली परब, अनुष्का पिंपुटकर, प्राजक्ता हनमघर आदी मातब्बर कलाकारांच्या यामध्ये भूमिका आहेत. 13 कलाकार या चित्रपटात काम करत आहेत. शूटिंग दरम्यान आज सिनेमाच्या टीमने पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी मकरंद देशपांडे म्हणाले की, आज व्हॉट्सअप ग्रुप मुळे सगळेच कलाकार झाले आहेत. त्यामुळे एखादी गोष्ट टीका न मानता पुढे जायला शिकले पाहिजे. 
 

Related Articles