क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालकावर कठोर कारवाई करा   

मनसेची मागणी

 
पिंपरी :  रावेत येथील एका निवासी अकॅडमीमध्ये शिकणार्‍या दहावीतील विद्यार्थिनीवर क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून संचालकाला अटक केली आहे.  पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलीस आयुक्तांची भेट घेत संचालकावर कठोरात-कठोर कारवाईची मागणी केली. निवासी अकॅडमीमधील विद्यार्थिनीवर दुष्कृत्य करणारा नौशाद शेख हा क्रिएटिव्ह अकॅडमी या नावाखाली रावेत येथे निवासी शाळा चालवतो. त्याच शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी दि. 30 जानेवारी रोजी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी क्रिएटिव्ह अकॅडमी या निवासी शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी चर्चा केली. 
 
तसेच त्यांचे समुपदेशन करून गैरप्रकार झाला असल्यास तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यांनतर आणखी एका पीडित विद्यार्थिनीने गैरप्रकार झाल्याचे सांगितले. त्यावरून शेखवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी  मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले,उपशहराध्यक्ष चंद्रकांत बाळा दानवले, राजू सावळे, सचिव रुपेश पटेकर, महिला शहराध्यक्ष सिमा बेलापुरकर व शहर संघटक जयसिंग भाट यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत तक्रारीचे निवेदन दिले.
 

Related Articles