क्रीडा प्रबोधिनीचा बोलबाला, सिनियर्स आणि ज्युनियर्स गटाचे विजेते, तर पुणे जिल्हा आणि मुंबई उपविजेते   

नागपूर : (क्री. प्र.) स्पर्धा म्हटली की जिंकणे हरणे आले, त्यात आनंद तर आहेच पण याहीपेक्षा मोठा आनंद हा स्पर्धेमधील सहभागाचा आहे कारण स्पर्धेमधील भाग घेणे हा सुद्धा एक खूप मोठा अवॉर्ड असे प्रतिपादन कार्यक्रमाचे विशेष अतिथी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केले. पुनिता बालन प्रस्तुत सुवर्ण महोत्सवी राज्य ज्यूदो स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. विभागीय क्रीडा संकुल, मानकापुर येथे दिनांक 02 ते 04 फेब्रुवारी दरम्यान आयोजित या स्पर्धेच्या कार्यक्रमास फिल्मफेयर अवॉर्ड विजेत्या तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सत्यशोधक’ सिनेमाच्या नायिका आणि छत्रपती संभाजीनगरच्या ज्यूदोपटू राजश्री देशपांडे या होत्या. यावेळी व्यासपीठावर नागपुरातील प्रसिद्ध उद्योगपती प्रफुल्ल जामदार यांची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन संघटनेचे तांत्रिक समिती सचिव दत्ता आफळे यांनी केले. 
 
नितिन गडकरी पुढे म्हणाले की, स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेऊनच विजयी होता येते आणि असे केल्यानेच आपल्या सारखे खेळाडू भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार आहात आणि त्यामुळे आपणच देशाला मानाचे पुरस्कार प्राप्त करून देणार आहात. 
 
कै. आमदार मुक्ता शैलेश टिळक स्मृती सर्वसाधारण सांघिक महिला विजेते क्रीडा प्रबोधिंनी यावेळी सर्वसाधारण विजेतेपदाचे चषक माननीय मंत्रीमहोदयांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तर उपविजेतेपदाचे चषक अभिनेत्री राजश्री देशपांडे यांच्या हस्ते खेळाडूंनी स्वीकारले. कै. आमदार मुक्ता शैलेश टिळक स्मृती या सर्वसाधारण सांघिक महिला विजेता चषकासह स्पर्धेतील सिनियर्स आणि ज्युनियर्स या दोन्होही गटाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचे मानकरी पुण्याच्या क्रीडा प्रबोधिंनीच संघ राहिला. कै. आमदार मुक्ता शैलेश टिळक स्मृती सर्वसाधारण सांघिक महिला उपविजेता चषकाचा विजेता ठाण्याचा महिला संघ ठरला. या दोन्ही चषकांचे वितरण अभिनेत्री राजश्री देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा प्रबोधिनीच्या संघाने तीन विविध चषके  पटकावून इतिहासात नोंद केली तर सिनियर्स गटाचे सर्वसाधारण उपविजेतेपद पुणे जिल्हा संघटनेने आणि ज्युनियर्स गटाचे सर्वसाधारण उपविजेतेपद मिळवले. 
 
स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद शासनाच्या क्रीडा प्रबोधिनी संघाने 12 सुवर्ण पदके पटकावत मिळवले आणि हा संघा पुनित बालन गृप चषकाचा मानकरी ठरला. कोल्हापूर आणि मुंबई संघाने प्रत्येकी 6 सुवर्ण पदके मिळवून लोकमान्य क्रेडिट सोसायटी, पुणे चषकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र, कॉसमॉस बँक, लोकमान्य क्रेडिट सोसायटी आणि अ‍ॅमनोरा यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. 
 

निकाल खालीलप्रमाणे

 
सब-ज्यूनियर्स गट- मुली
 
28 किलोखालील 
 
सुवर्ण-ऋजुता पाटील, कोल्हापूर 
रौप्य-अनिशा गोडबोले, नागपूर
कांस्य-खुशी धांनांनी, मुंबई
कांस्य-सायमा सदाफ, छत्रपती संभाजीनगर
 
32 किलोखालील 
 
सुवर्ण- यशस्विनी जाधव, कोल्हापूर
रौप्य-ज्ञानेश्वरी मेश्राम, वर्धा
कांस्य-पुजा कोपर्डे, सांगली
कांस्य-स्नेहल ढोरे, यवतमाळ
 
36 किलोखालील 
 
सुवर्ण-आयेशा शेख, 
रौप्य-सिद्धी रनवडे, पीडिजेए
कांस्य-भक्ति दूरबुडे, वर्धा
कांस्य-श्रावणी सुरवसे, बीड
 
40 किलोखालील 
 
सुवर्ण-त्रिशा जाधव, मुंबई
रौप्य-समृद्धी कपिले, यवतमाळ
कांस्य-सई जगताप, नाशिक
कांस्य-वृंदा शेलार, पिजेए
 
44 किलोखालील 
 
सुवर्ण-श्रुतकीर्ति खलाटे, छत्रपती संभाजीनगर
रौप्य-ईश्वरी क्षीरसागर, नाशिक
कांस्य-अनुष्का काले, पिजेए
कांस्य-धनाश्री भोयार, वर्धा
 
48 किलोखालील 
 
सुवर्ण-याशिका असावल्ले, मुंबई
रौप्य-भक्ति लोमटे, छत्रपती संभाजीनगर
कांस्य-मृण्मई बेंडखळे, ठाणे
कांस्य-वैष्णवी वाघ, नाशिक
 
52 किलोखालील 
 
सुवर्ण-श्रावणी डिके, यवतमाळ
रौप्य-वैष्णवी मोरे, नाशिक
कांस्य-निधी कुदळे, पीडिजेए
कांस्य-प्राची अनभोरे, अहमदनगर
 
57 किलोखालील 
 
सुवर्ण-अंजली बाभुळकर, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य-श्रुष्टी देसले, नाशिक
कांस्य-जियाना कोटक, मुंबई
कांस्य-खुशिता पवार, सातारा
 
57 किलोवरील
 
सुवर्ण-दानिका शेट्टी, मुंबई
रौप्य-इरा माकोडे, ठाणे
कांस्य-अलफिया मगदुम, छत्रपती संभाजीनगर
कांस्य-संस्कृती धवणे, धाराशीव
सब-ज्यूनियर्स गट- मुले
 
30 किलोखालील 
 
सुवर्ण-विश्वजित घाडगे, सांगली
रौप्य-शौर्य मंडलिक, कोल्हापूर
कांस्य-अजिंक्य रनवडे, पीडिजेए
कांस्य-ओंकार शिंदे, सोलापूर
 
35 किलोखालील 
 
सुवर्ण-वेदान्त मुधोळकर, यवतमाळ
रौप्य-अजिंक्य नरुटे, पिजेए
कांस्य-नील जवळे, छत्रपती संभाजीनगर
कांस्य-श्रेयश पाटील, कोल्हापूर
 
40 किलोखालील 
 
सुवर्ण-हिमांशु पगारे, धुळे
रौप्य-सागर वानखडे, यवतमाळ
कांस्य-अनुज मादये, छत्रपती संभाजीनगर
कांस्य-आर्यन शेंडे, क्रीडा प्रबोधिनी
 
45 किलोखालील 
 
सुवर्ण-अथर्व थडके, कोल्हापूर
रौप्य-उज्वल फरकुंडे, गोंदिया
कांस्य-प्रत्युश कुलकर्णी, नागपूर
कांस्य-सार्थक चव्हाण, नाशिक
50 किलोखालील 
सुवर्ण-शौर्य बिचुकले, पीडिजेए
रौप्य-उल्हास पोवार, ठाणे
कांस्य-अथर्व बंडगर, सांगली
कांस्य-रोहण मोटे, लातूर
 
55 किलोखालील 
 
सुवर्ण-विरेन कळगावे, सांगली
रौप्य-इंद्रजीत गीरीबुवा, कोल्हापूर
कांस्य-ऋतुराज जाधव, मुंबई
कांस्य-वेद सरबेरे, यवतमाळ
 
60 किलोखालील 
 
सुवर्ण-सोहम देवकर, पिजेए
रौप्य-प्रमित कांबळे, कोल्हापूर
कांस्य-ऋषभ भारती, मुंबई
कांस्य-शारव शेट्टी, ठाणे
 
66 किलोखालील 
 
सुवर्ण-वीरधवल मते, क्रीडा प्रबोधिनी
रौप्य-के. अयदाथिल, कोल्हापूर
कांस्य-कौस्तुभ व्ही, सातारा
कांस्य-शिवराज पाटील, धाराशीव
 
66 किलोवरील
 
सुवर्ण-हर्षवर्धन नागे, छत्रपती संभाजीनगर
रौप्य-संकेत शिंदे, सोलापूर
कांस्य-दारूल रजवी, नागपूर
कांस्य-तुषार गदादे, पिजेए
 
सर्वोत्कृष्ट दे-आशी-हराई हा डाव मारणारे खालील खेळाडू कै. भास्कर पटवर्धन, नाशिक स्मृती पुरस्काराचे मानकरी म्हणून जाहीर करण्यात आले. या सर्वांना रुपये 500/- रकमेचे बक्षीस नाशिकचे जेष्ठ ज्यूदो संघटक डॉ रत्नाकर पटवर्धन यांच्यातर्फे देण्यात आले.  
 
सुशांत काकुर्डे (धाराशिव), आदित्य परब, यश कांबळे आणि अथर्व (पीडिजेए), अंकित ठाकरे, प्रदीप कांदे,(वर्धा) ईशान कनोजिया, आयुष फाळके, अक्षज पिल्लई, (मुंबई), रोहित काळे,( पिजेए), शेख फर्जाद (छत्रपती संभाजीनगर), आदित्य सेड (अहमदनगर), स्नेहल खावरे, दर्शन गवळे, पृथ्वीराज शेलार (क्रीडा प्रबोधिनी), धनंजय खैरनार (धुळे), धनश्री गिरासे (नंदुरबार), वेदान्त पवार (सातारा)  रोहित चव्हाण (नाशिक), प्रदीप गायकवाड (सोलापूर), विश्वजित घाडगे, विरेन कळगावे (सांगली)
 

Related Articles