E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
07 Feb 2024
आता केवळ ‘वाहतो ही दुर्वांची
जुडी’चाच प्रयोग करायचा ना सर?
--------------------
पोस्ट लिहूनही लाईक्स न मिळाल्याने शिष्याने जेंव्हा मोबाईल खाली ठेवण्याचा निर्णय घेतला तेंव्हा त्याच्या गुरुने फेसबुक आणि व्हाटस्अप बाबत तीन सत्ये त्या शिष्याला समजावली
1) ज्यांना तुझे विचार आवडतात, ते न वाचताही तुझी पोस्ट लाईक करतील..
2) ज्यांना तुझी पोस्ट आवडूनही,नाईलाजास्तव जे लाईक करू शकणार नाहीत,ते तुझी खाजगीत प्रशंसा नक्की करतील..
3) जे तुझ्या विरोधी विचारसरणीचे आहेत,त्यांना तुझी पोस्ट कितीही पटली तरी ते कधीच ती लाईक करणार नाहीत..!!
हे बालका! तू लिहीत रहा! पाठवत रहा!
फॉरवर्ड करीत रहा!
-----------------
सुखा तुझ्याच बागी
मी नाचण्यास आलो,
त्यातील या फुलांना,
मी हुंगण्यास आलो ॥ 1 ॥
सुखा तसा तुझ्या रे,
मी नाही ओळखीचा,
ओळख माझी देण्या
दारी तुझ्या मी आलो ॥ 2 ॥
दुःखास टाळूनिया
आनंद व्यक्त करण्या
बागेत ह्या सुखाच्या
बागडण्या मी आलो ॥ 3 ॥
दुःखी कधीच नव्हतो
हे सांगताच लोका,
वेडाच मीही ठरलो
हे सांगण्यास आलो ॥ 4 ॥
दारावरून जाता
दुःखाचा रे जनाजा
माझ्याच ह्या सुखाला
प्रणाम करून आलो ॥ 5 ॥
- माधव मनोहर जोशी, मो. : 9833159630
रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होतं..
ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात.. त्यांना ट्रेकिंगला जायची गरज नसते..
जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..
गाढ झोपेत काहीच ऐकू न येणार्या लोकांना.. तिकडे सरक हा शब्द कसा काय ऐकू जातो..?
आपल्या सोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त हं.. हं... करत असतो.. त्याला काहीच ऐकू येत नसतं..
जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..
जेव्हा आपण सॅड मूडमध्ये असतो.. तेव्हा गाणं गातो नंतर आपल्याला कळतं की आपला आवाज तर आपल्या कंडिशन पेक्षा पण खराब आहे..
------------
आजकालच्या मावश्या स्वत: ला
माऊ म्हणवून घेतात.
मग काकांनी स्वत:ला
काऊ म्हणून घ्यायला हवं का?
एक तरुण माणूस फार उधळ्या होत्या. त्याने आपली सगळी मिळकत दारू, जुगार सारख्या व्यसनात घालविली. मग तो दरिद्री होऊन भिकार्यासारखा अरण्यात फिरू लागला. हिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक उन्ह पडले होते. अशा वेळी तो माणूस नदीकाठी फिरत असता जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली त्याने पाहिली.
कडक उन्ह व कोकिळा पाहून त्याला वाटले की, खरंच उन्हाळा आला व आता पांघरुणाची काही गरज नाही, असा विचार करून त्याने आपले काही कपडे गहाण ठेवले व पैसे काढून तो आपल्या मित्राबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला. तेथे त्याने सगळे पैसे जुगारात घालविले. संध्याकाळी थंडी पडली; तेव्हा त्याला थंडीमुळे आजारपण आले.
उन्हाळा असून असे कसे झाले याचे आश्चर्य करीत तो पुनः नदीवर गेला तर तेथे तो कोकीळ पक्षी थंडीने गारठून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला. तो प्रकार पाहून तो चांगलाच शुद्धीवर आला व मग त्या पक्ष्याला म्हणाला, ’अरे, मी तुझ्यावर विश्वास ठेवून आपले कपडे गहाण ठेवण्याचा मूर्खपणा केला, तू मला फसवलंस आणि स्वतःचाही नाश करून घेतलास.’
तात्पर्य : व्यसनी माणूस काही वेळा इतका बेसावध असतो की, त्याला सभोवतालच्या गोष्टीचेही भान रहात नाही.
---------------
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन ते अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुसर्याचं हिसकावून खाणार्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही.
------------------
पत्नी : जर मी कायमची निघून गेले तर तुम्ही काय कराल?
पती : मी अक्षरशः वेडा होईन!
पत्नी : दुसरे लग्न नाही ना करणार?
पती : आता वेड्याचा काय भरवसा!
Related
Articles
बांगलादेशात पुन्हा उफाळला हिंसाचार
07 Feb 2025
गाईंचा चोरटा व्यापार करणार्यांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देेणार
06 Feb 2025
पाकिस्तानातही भरला कुंभमेळा...
02 Feb 2025
जुन्नर तालुक्यातील द्राक्षांची बांगलादेशात निर्यात
07 Feb 2025
बारामतीत पोलिसांचा मनमानी कारभार
07 Feb 2025
विद्यार्थी-शिक्षक प्रमाण सुधारण्याची गरज : तज्ज्ञांचे मत
05 Feb 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
असर’च्या अहवालातून शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
2
‘करारांचा’ लाभ किती?
3
वेतन वाढेल; जबाबदारीचे काय?
4
कनिष्ठ, मध्यम वर्गाचा अपेक्षाभंग!
5
पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’
6
भारतीय मुलींनी जिंकला विश्वचषक