इम्रान यांच्या उमेदवारांवर दहशतवादाचे खटले   

इस्लामाबाद : पाकिस्तानातील निवडणूक आता एकतर्फी होण्याची चिन्हे आहेत. कारण पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या इम्रान खान यांच्या उमेदवारांवर दहशतवादाचे खटले दाखल झाले आहेत. इम्रान खान भ्रष्टाचारात दोषी ठरल्याने शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे प्रबळ नेता नसलेला पक्ष अशी पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाची परिस्थिती झाली आहे. 
 
इम्रान त्यांची पत्नी बुशिरा आणि निकटवर्तीय, माजी परराषट्र मंत्री कुरेशी यांनाही कठोर शिक्षा झाली आहे.  नवाझ शरीफ काही महिन्यांपूर्वी  खास निवडणुकीसाठी लंडन येथून आले आहेत. त्यांनी पक्षाच्या विजयासाठी कंबर कसली आहे. इम्रान यांना निवडणूक अपात्र ठरवले आहे. त्यांच्या पक्षाचे बॅट चिन्हही आयोगाने गोठवले आहे. त्यामुळे उमेदवार नव्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. आता त्यांच्या अनेक उमेदवारांवर दहशतवादाचे आरोप ठेवले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर नवे संकट निर्माण झाले आहे.  एकंदरीत नवाझ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) आणि माजी पंतप्रधान बेनझिर भुत्तो यांचा मुलगा आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचा प्रमुख बिलावल भुत्तो यांच्यात लढत आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याने स्वत:चा पक्ष काढला असून तो निवडणुकीच्या मैदानात असून मत विभाजन करू पाहत आहे. 

Related Articles