ट्रम्प यांची महिलांबाबत शेलकी विधाने सुरुच   

निक्‍की हेलींचा उल्‍लेख बर्डब्रेन

 
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे प्रमुख उमेदवार डोनाल्ड ट्रम्प शेलक्या भाषेत महिला उमेदवारांवर टीका करत असल्याचे पुन्हा उघड झाले. प्रतिस्पधी उमेदावार निक्‍की हेली यांच्यावर त्यांनी आता अशीच टिप्पणी केली आहे. त्यांनी त्यांचा उल्‍लेख बर्डब्रेन (पक्ष्याप्रमाणे मेंदू असलेली महिला) असा केल्याने वाद निर्माण झाला आहे.
 
डोनाल्ड ट्रम्प नेहमीच विरोधी पक्षांच्या उमेदवारांची खिल्‍ली उडविण्यासाठी टोपण नावे देत आले आहेत. असे करून त्यांची प्रतिष्ठा समाजात कमी करणयाचे उद्योग त्यांनी अनेकदा केले आहेत. आपली प्रतीमा उजळ करण्यासाठी ते अन्य उमेदवरांचा उल्‍लेख सभेत आपण दिलेल्या टोपण नावाने करत आले आहेत. त्यावरून अनेकदा वाद झाले आहेत. निक्‍की हेली यांचा उल्‍लेख त्यांनी बर्डब्रेन असा केला. यापूर्वी  हेलरी क्लिटंन यांना नॅस्टे वूमन, नॅन्सी पॅलोसी यांना क्रेझी नॅन्सी,  कमला हॅरिस यांना नॅस्टे, लिझ क्रेझी यांना क्रेझी लिझ चेनी, हेवलेट पॅकार्डच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्ले फिरोनिया यांना हिचा चेहरा पाहा, असे जाहीर सभेत हिणवले होते. त्यामुळे महिला अनेकदा ट्रम्प यांच्यावर संतप्‍त झाल्या होत्या. महिला द्वेषी वक्‍तव्ये त्यांनी वारंवार केली आहेत. त्यामुळे ते महिलांच्या रोषास पात्र ठरले आहेत. 
 

Related Articles