E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
देश
नैसर्गिक वायू क्षेत्रात पाच लाख कोटींची गुंतवणूक : मोदी
Samruddhi Dhayagude
06 Feb 2024
पणजी : येत्या पाच ते सहा वर्षांत ऊर्जा क्षेत्रात विशेषत: नैसर्गिक वायूमध्ये 5.5 लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले.बेतुल येथे आयोजित दुसर्या इंडिया एनर्जी वीकमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले. देशातील ऊर्जा क्षेत्रांत होणारी मोठी गुंतवणूक जगातील सर्वात वेगाने वाढणार्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पोषक ठरणार आहे. देशांतर्गत घरगुती नैसर्गिक वायूचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे उत्पादन 6.3 टक्क्यांवरून 2030 अखेर 15 टक्के वाढविण्याची योजना आखली आहे.
2070 पर्यंत देश कार्बन उत्सर्जन मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी नैसर्गिक वायू महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे त्याचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरू आहेत. नैसर्गिक वायूचा वापर वीज निर्मिती, खत निर्मिती आणि वाहनांतील सीएनजीसाठी केला जातो. तसेच स्वयंपाकासाठी वापरला जातो. विशेष म्हणजे त्या माध्यमातून प्रदूषण होत नाही. जैव इंधन आणि कोळश्याला तो सर्वोत्तम पर्याय आहे, असे मोदी यांनी सांगितले.
कतारसोबत द्रवरूप वायू खरेदीचा करार
भारत आणि कतारमध्ये द्रवरूप नैसर्गिक वायू खरेदीचा करार होणार आहे. लाखो अब्ज डॉलर्सचा करार सुमारे 20 वर्षांचा असून 2048 पर्यंत कतार भारताला आजच्या किंमतीतच द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा करणार आहे. पेट्रोनेट नैसर्गिक द्रवरूप वायू लिमिटेड आणि कतार एनर्जी कंपनी करारावर स्वाक्षर्या करणार आहे. या माध्यामातून दरवर्षी 70 लाख टन वायूची आयात भारतात होणार आहे. सूत्रांनी सांगितले की, वायूचे दर सध्या विकल्या जाणार्या दरापेक्षा कमी असतील. कंपनीसोबतचा 25 वर्षांपूर्वी केलेला करार 2028 मध्ये संपुष्टात येत आहे. तो आता आणखी 20 वर्षांनी वाढविला जाणार आहे. दरम्यान, 2015 मध्ये 10 लाख टन वायू खरेदीचा दुसरा करार कतारसोबत भारताने केला होता. त्याबाबत पुन्हा फेरचर्चा केली जाणार आहे.
Related
Articles
ज्येष्ठांना विश्रांती; वादग्रस्तांना डच्चू!
07 Dec 2024
कल्याणीनगर प्रकरणातील दहा आरोपींची एकत्रित चौकशी
06 Dec 2024
बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांकडून दोन माजी सरपंचांची हत्या
06 Dec 2024
चिंचवड रेल्वे मार्गावर उभारणार नवीन पूल
04 Dec 2024
चॅम्पिअन्स ट्रॉफी आयोजनाचा संभ्रम !!
05 Dec 2024
नगरसेवक ते तिसर्यांदा मुख्यमंत्री...
05 Dec 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
समाज परिवर्तनाची सकारात्मक चळवळ
2
आणखी दहा दिवस शेवगा खरेदी विसरा!
3
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उद्या पदवी प्रदान सोहळा
4
मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील
5
’संगीत स्वयंवर’नाट्यप्रयोग पुढील आठवड्यात
6
पुण्यातील थंडी गायब