हिमाचलमध्ये दरड कोसळून दोन मजुरांचा मृत्यू; पाच वाचले   

सिमला : हिमाचल प्रदेशात दरड कोसळून दोन मजुरांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. राजधानी सिमल्यापासून काही अंतरावर पहाटे साडे तीन वाजता  दरड कोसळली होती.
राकेश (वय 31) आणि राजेश (वय 40) यांचा दरडीखाली चेंगरून मृत्यू झाला आहे. दोघेही बिहारचे रहिवासी होते.  एका दुमजली इमारतीच्या परिसरात काही मजूर झोपले होते. इमारतीवर दरड कोसळून इमारत कोसळली. त्याखाली ते गाडले गेले होते. ढिगार्‍याखाली दोघांचे मृतदेह बाहेर काढले असून  अन्य पाच मजूर थोडक्यात वाचले. ढिगार्‍याखाली कोणी अडकले आहे का ? याचा शोध आपत्ती व्यवस्थापन दल आणि अग्‍निशमन दलाचे कर्मचारी घेत आहेत. शोध मोहीम वेगाने सुरू आहे. उपायुक्‍त आणि विभागीय दंडाधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असून कामाची पाहणी केली. 

Related Articles