चिली आगीतील मृतांची संख्या १२३ वर   

सँटियागो : चिलीतील जंगलातील वणव्यात होरपळून आतापर्यत १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो नागरिक बेपत्ता झाल्याने चिंता व्यक्‍त केली जात आहे.चिलीतील विना डेल मारसह तीन शहरांजवळील जंगलाला गेल्या शुक्रवारी भीषण आग लागली होती. सोमवारी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. अजूनही काही ठिकाणी आग धूमसत आहे. पाहणी केली तेव्हा १२३ नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला असून शेकडो अद्यापी बेपत्ता आहेत. अध्यक्ष गॅब्रिएल बारीक यांनी सांगितले की, अग्‍नितांडवत तीन हजार घरे बेचिराख झाली आहेत. सोमवारी दुपारी आणखी दहा जणांचे मृतदेह मिळाल्याने बळींची संख्या वाढली आहे. आग एवढी भीषण होती की, अनेक मृतदेहांची ओळख पटवणे अवघड झाले. न्याय वैद्यक विभाग आणि गुणसूत्र तज्ज्ञांच्या मदतीने मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम हाती घेतले आहे. ओळख पटताच ते अंतिम संस्कारासाठी नातेवाईकांकडे सोपविले जातील.

Related Articles