वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीची आत्महत्या   

नवी दिल्‍ली : वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीने वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केल्याचे उघड झाले. तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या आवस्थेत सोमवारी आढळला होता. 
मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात तिने रविवारी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली होती. 23 वर्षीय विद्यार्थिनीचे नाव जाहीर केलेले नाही. तसेच आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी तिने लिहिली नसल्याचे आढळल आहे. आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली. ती शेवटच्या वर्षात शिकत होती. ती मूळची दिल्‍लीची आहे. रविवारी सकाळीं ती घरी गेली होती. सायंकाळी वसतिगृहात परतली होती. तिने रात्री मित्रांसोबत जेवण केले होते. रात्री ती खोलीत परतली होती.सकाळी तिच्या मैत्रिणींनी खोलीचा दरवाजा ठोठावला. परंतु आतातून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा फोडून आत प्रवेश केला असता तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले. मोबाइलवरील संभाषण आणि व्हॉट्सअ‍ॅपमधील संदेशातून काही उघड होते का ? याचा तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 

Related Articles