राजे तिसरे चार्ल्स यांना कर्करोगाचे निदान   

लंडन : ब्रिटनचे राजे तिसरे चार्ल्स यांना एका प्रकारच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. बकिंगहॅम राज प्रासादातून याबाबतची माहिती सोमवारी देणयात आली. 
चार्ल्स यांना प्रोस्टेटचा कर्करोग झालेला नाही; परंतु त्यांच्या प्रोस्टेटचा आकार मात्र वाढला आहे. त्यांना कर्करोग झाला आहे. परंतु कोणता? याबाबत खुलासा राजप्रासादातून करण्यात आलेला नाही. त्याबाबत  तपासणी सुरू असल्यामुळे त्यांचे निर्धारित कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. उपचारानंतर ते सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतील, असे सांगण्यात आले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यंनी चार्ल्स लवकर बरे व्हावेत, अशी पोस्ट एक्सवर केली आहे. 
 

Related Articles