पुणे : कोंढव्यात अकराव्या मजल्यावरील सदनिकेत आग   

पुणे : कोंढवा परिसरात एका बहुमजली इमारतीत अकराव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेत मंगळवारी दुपारी आग लागली. आग लागल्यानंतर रहिवासी भयभीत झाली. इमारतीच्या गच्चीवर रहिवासी पळाले.अग्निशमन दलाच्या जवानांनी पाऊण तासात आग आटोक्यात आणली. कोंढव्यातील महंमदवाडी परिसरात दिल्ली पब्लिक स्कूलजवळ बहुमजली इमारत आहे.
 
इमारतीत अकराव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेतून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाला कळविली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अकराव्या मजल्यावरील सदनिकेत लागलेली आग भडकल्याने रहिवासी भयभीत झाले. रहिवासी घाबरून इमारतीच्या अकराव्या मजल्यावर गेले. घटनास्थळी पाच बंब आणि उंच शिडीचे वाहन दाखल झाले होते. जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही.

Related Articles