लष्कराच्या तुकड्या १० मेपर्यंत परत   

माले : भारतीय लष्कराची पहिली तुकडी 10 मार्चपर्यंत परत पाठवली जाईल,  उर्वरित दोन तुकड्या 10 मेपर्यंत भारताकडे रवाना केल्या जातील, असे मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद  मुईज्जू यांनी सोमवारी सांगितले. मालदीवच्या संसदेत त्यांनी भारतीय तुकड्यांना मायदेशी ाठविण्यासंदर्भातील वेळापत्रकाची माहिती दिली. तुकड्यांनी व्यापलेला भाग देशात सहभागी  करून घेतला जाणार आहे. देशाच्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.मुईज्जू यांनी गेल्या वर्षी 17 नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर भारतीय लष्कराच्या 88 जवांनाना 15 मार्चपर्यंत परत पाठवण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मालदीवच्या मतदारांनी मला अध्यक्षपदी निवडून  भक्‍कम जनादेश दिला आहे. त्यानुसार भारत सरकारला लष्करी तुकड्या मागे घेण्याची विनंती त्यांनी केली होती.  निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी या बाबीचा आवर्जून उल्‍लेख केला होता. 

Related Articles