लष्करप्रमुखांना बडतर्फ करणार : झेलन्स्की   

किव्ह : लष्करप्रमुखांना बडतर्फ करण्याचा विचार सुरू असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वाल्दिमीर झेलन्स्की यांनी सोमवारी सांगितले. त्यामुळे युक्रेनला सहकार्य करणार्‍या अमेरिका, ब्रिटनसह विविध देशांना धक्‍का बसला आहे.रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या काही वर्षापाासून भीषण युद्ध सुरू आहे. युद्ध प्रदीर्घकाळ चालले आहे. त्यात कोणाचीही सरशी अथवा पराभव झालेला नाही. रशियाकडून युक्रेनवर आक्रमक कारवाई सुरू आहे. त्याला युक्रेनकडून प्रत्त्युत्तर दिले जात आहे. युद्धात सर्वांधिक हानी युक्रेनची झाली आहे. शेकडो, हजारो इमारती देशाच्या विविध भागांत कोसळल्या आहेत तसेच लाखोंच्या संख्येने नागरिक बेघर आणि स्थलांतरित झाले आहेत. युद्धात विजय प्राप्‍त करण्याचा दोन्ही देशांचा हेका कायम आहे. पण, पडती बाजू पाहता आता झेलन्स्की यांनी लष्करप्रमुख व्हॅलेरी झालुन्झी यांना बडतर्फ करण्याचा विचार असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे. या संदर्भातील विचार त्यांनी रविवारी बोलून दाखवले आहेत. 
 
ते म्हणाले, नव्याने सुरूवात करण्यासाठीं तसे करणे आवश्यक बनले आहे. व्यक्‍ती म्हणून नाही तर देशाला योग्य दिशा आणि नेतृत्व प्राप्‍त व्हावे, यासाठी मी माझे मत मांडले आहे. केवळ लष्करप्रमुखच नव्हे सर्व काही नव्याने करण्याचा विचार करत असल्याचे सांगताना ते म्हणाले, राज्याचे नेतृत्वातही बदल करावा लागेल. एकजुटीने सर्वानी प्रयत्न केला तर विजय आपलाच असेल. लष्करातील खांदेपालट करून लष्कराचे मनोधैर्य कमी होईल, असे मी मानत नाही. दरम्यान, काही जणांना झेलन्स्की यांचे विचार पटलेले नाहीत. लष्कर्रप्रमुख लोकप्रिय आहेत. त्यांना बडतर्फ करणे चुकीचे आहे. त्याचे चांगले परिणाम होणार नाहीत. रशियासाठी ही बाब पथ्यावर पडणारी असल्याचे मतही काहींनी व्यक्‍त केले. लष्करप्रमुखांना बडतर्फ केले तर युक्र्रेनमध्येच नव्या वादाला निमंत्रण मिळेल, असा इशाराही काहींनी दिला आहे. 
 

Related Articles