ऑस्ट्रेलियाच्या ब्लॉगरला चीनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा   

बीजिंग : ऑस्ट्रेलियाच्या चिनी वंशाच्या ब्लॉगरला चीनने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. परंतु ती केव्हाही जन्मठेपेत रूपांतरित करता येईल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. या निकालाचा निषेध  ऑस्ट्रेलियाने केला आहे.डॉ. यांग हेंंगीयून, असे ब्लॉगरचे नाव आहे. ते सातत्याने लोकशाहीचे समर्थन करणारे विषय मांडत आले होते. त्यामुळे त्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. 
 
गेली दोन वर्षे ते चीनच्या तुरुंगात आहेत. यांग हे चीनचे माजी राजनैतिक आणि गुप्‍तहेर होते. यानंतर ते राजकारणात आले.  त्यांची देशाबाहेर हकालपट्टी करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियात असतानाच त्यांनी गुप्‍तहेरावर कादंबरी लिहिली होती. 19 जानेवारी 2019 रोजी ते न्यूयॉर्क येथून दक्षिण चीनमधील गुआंगुज शहरात पत्नी आणि सावत्र मुलीसह आले. तेव्हा त्यांना अटक झाली होती. मे 2021 मध्ये तुरुंगात डांबले होते. तत्पूर्वी 2002 मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व स्वीकारले. पण, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियासाठी हेरगिरी करण्यास नकारही दिला होता.
 
दरम्यान, यांग यांची मृत्युदंडाची शिक्षा रद्द करावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वाँग यांनी दिली. डॉ. यांग यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावल्याचे मला आश्‍चर्य वाटले. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते वांग वेनबीन यांनी सांगितले की, मृत्युदंडाची शिक्षा कालांतराने जन्मठेपेत बदलू शकते. 
 

Related Articles