E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
देश
चंपई यांनी ‘विश्वास’ जिंकला
Samruddhi Dhayagude
06 Feb 2024
रांची : झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चाच्या (जेएमएम) आघाडी सरकारने सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. झारखंड विधानसभेची सदस्य संख्या 81 असून काल 77 सदस्य सभागृहात उपस्थित होते. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 47 आणि विरोधात 29 मते पडली. अपक्ष आमदार शरयू रॉय गैरहजर होते.
राज्यात झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल यांची आघाडी आहे. तर, सीपीआयएमएल (एल) आमदाराचा सरकारला बाहेरुन पाठिंबा आहे.
विरोधी पक्ष भाजपचे 29 आमदार असून मित्रपक्ष आजसू पक्षाचे 3 आमदार आहेत.झारखंड मुक्ती मोर्चाचे विधिमंडळ पक्षाचे नेते चंपई सोरेन यांनी 2 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. जेएमएमचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपई सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली होती. सोरेन यांनी राजीनामा देताच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना अटक केली होती. कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. चंपई सोरेन यांच्यासमवेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर आलम आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते सत्यानंद भोक्ता यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी चंपई सोरेन यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 दिवसांचा अवधी दिला होता. त्यानंतर, सोरेन यांनी सोमवारी विश्वासदर्शक ठराव आणला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, काल हा ठराव आला.चंपई सोरेन यांच्या शपथविधीनंतर सत्ताधारी पक्षाचे 38 आमदार काँग्रेसशासित तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये विशेष विमानाने गेले होते. जेएमएला भाजपकडून आमदार फोडाफोडीच्या प्रयत्नाची भीती सतावत होती. हे सर्व आमदार रविवारी रात्री उशिरा रांचीमध्ये परतले.
सोरेन यांनी बजावला मतदानाचा हक्क
सक्तवसुली संचालनालयाच्या ताब्यात असलेले हेमंत सोरेन यांनी पीएमएलए (आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा) न्यायालयाच्या परवानगीनंतर विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात सहभाग घेतला.
Related
Articles
पुण्यातील थंडी गायब
05 Dec 2024
चक्रीवादळाचा जोर ओसरला; पुद्देचेरीत मुसळधार पाऊस
02 Dec 2024
वाचक लिहितात
05 Dec 2024
मराठीच्या अभ्यासू संशोधक डॉ. स्वाती कर्वे यांचे निधन
05 Dec 2024
थकबाकी असलेल्या ५०५९ मालमत्तांचे जप्ती अधिपत्र
08 Dec 2024
संघ, भाजप देशातील मोठी तुकडे तुकडे गँग
07 Dec 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
समाज परिवर्तनाची सकारात्मक चळवळ
2
आणखी दहा दिवस शेवगा खरेदी विसरा!
3
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उद्या पदवी प्रदान सोहळा
4
मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील
5
’संगीत स्वयंवर’नाट्यप्रयोग पुढील आठवड्यात
6
पुण्यातील थंडी गायब