राहुल यांनी घेतली सोरेन यांच्या पत्नीची भेट   

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांची भेट घेतली. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबतची माहिती दिली.
 
झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांना कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतीच अटक केली. सोरेन सध्या ईडी कोठडीत आहेत. राहुल यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सध्या झारखंडमध्ये आहे.

Related Articles