मुलांना प्रचाराला जुंपता येणार नाही   

निवडणूक आयोगाचा इशारा

 
नवी दिल्‍ली : निवडणुकीच्या प्रचारात मुलांचा वापर करू नये,  त्यांना पोस्टर आणि पॅम्प्लेट वितरणाच्या कामातही जुंपू नका, असा सावधगिरीचा इशारा निवडणूक आयोगाने देशातील विविध पक्षांना सोमवारी दिला आहे. 
 
विविध पक्षांचे नेते आणि मंडळी प्रचारासाठी मुलांचा वापर सर्रास  करत असल्याचे दिसून आले आहे. निवडणूक प्रचाराचे साहित्य त्यांच्या हातात देऊन ते पक्ष आणि उमेदवारांचा प्रचार करताना आढळले होते. आता त्यांना तसे करता येणार नाही. 
 
प्रचारात मुलांचा वापर केला जात असल्यास आयोगाचे अधिकारी अणि यंत्रणेने पक्षांना रोखावे, असे आवाहनही आयोगाने केले.  मुलांना प्रचारात जुंपण्यापासून रोखण्याची जबाबदारी वैयक्‍तिकरीत्या जिल्हा निवडणूक अधिकारी आणि रिटर्निग ऑफिसरची यांच्यावर आता असणार आहे. नियमांचे उल्‍लंघन केल्यास निवडणूक यंत्रणेच्या तरतुदीनुसार आणि अधिकार क्षेत्रानुसार पक्ष आणि उमेदवारांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. 
 
राजकीय नेते आणि उमेदवार यांनी प्रचारात मुलांचा वापर करू नये. त्यामध्ये मुलांना पकडणे, मोटारीतून मुलांना नेणे किंवा मेळाव्याता सहभागी करून घेणे, असे प्रकार आता भविष्यात चालणार नाहीत. पक्ष नेते आणि उमेदवार यांनी राजकीय प्रचारात कविता, गाणी, वाक्ये याच्यासाठी मुलांचा वापर करून नये. तसेच मुलांची छबी देखील प्रचारात वापरता येणार नाही. निवडणूक प्रचारात सहभागी नसलेल्या राजकीय नेत्यासोबत मुले आणि त्यांचे पालक असतील तर परवानगी असणार आहे. ही बाब आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार नियमाचे उल्‍लंघन मानली जाणार नाही. राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोग यांचे नाते जुनेच आहे. लवकरच लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर लोकशाहीच्या रक्षणासाठी दोघेही कार्यरत आहेत.  
 

Related Articles