लखनौ : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमार्गे जाणार आहे. यात्रेसाठी मला काँग्रेसने निमंत्रण दिलेले नाही, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले. मात्र, काँग्रेसने सर्व घटक पक्षांना यात्रेत सहभागी करून घेणार असल्याचे स्पष्ट केले. यादव यांच्या विधानावर काँग्रेसने स्पष्ट केले की, उत्तर प्रदेशातून जाणार्या यात्रेत इंडिया आाघाडीतील घटक पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांना सहभागी होता येणार आहे. कोणत्या जिल्ह्यातून यात्रा जाणार आहे, याचे वेळापत्रक एक ते दोन दिवसांत तयार केले जाणार आहे. मार्ग निश्चित झाल्यानंतर सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना निमंत्रण पाठवले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली.
Fans
Followers