देशात भूजल पातळीत वाढ : शेखावत   

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशात दरडोई पाण्याची उपलब्धता सातत्याने कमी होत आहे. परंतु, भूजल पुनर्भरणाच्या प्रयत्नांमुळे भूजल पातळी आता वाढू लागली आहे, असे जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोमवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. 
 
शेखावत म्हणाले, पाण्याचा योग्य वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि भारत 2047 मध्ये विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या वस्तुस्थिती लक्षात घेऊन देशात जलसंकट निर्माण होऊ नये, यासाठी शासनाकडून पाण्याबाबत सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

Related Articles