तेलंगणाचे संक्षिप्त नाव बदलले   

हैदराबाद : तेलंगणाचे संक्षिप्त नाव ’टीएस’ वरून ’टीजी’ करण्यात आले आहे.मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्री डी. श्रीधर बाबू यांनी यासंदर्भात माहिती दिली.  
 
श्रीधर बाबू म्हणाले, तेलंगणाच्या निर्मितीनंतर तत्कालीन टीआरएस सरकारने राज्याचे संक्षिप्त नाव म्हणून ’टीएस’ निवडले होते. मात्र, त्यांनी त्यासंदर्भातील कोणतेही नियम पाळले नाहीत. त्यामुऴे रेड्डी सरकारने तेलंगणाचे संक्षिप्त नाव ’टीएस’ वरून ’टीजी’ करण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या राजपत्रात ’टीएस’ऐवजी ’टीजी’ वापरले जाणार आहे. वाहन नोंदणी क्रमांकावर आता ’टीजी’ हा उपसर्ग असणार आहे. दरम्यान, सरकारने नवीन राज्य चिन्हाची डिझाइन करण्याचा तसेच ’जय जय हो तेलंगणा’ हे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात जात जनगणना करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला.
 
राज्य विधानसभेचे अधिवेशन 8 फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहे. अधिवेशनात 500 रुपयांना गॅस सिलिंडर आणि घरांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज अशा दोन गॅरंटीवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
 

Related Articles