उत्तर प्रदेशात मोटार अपघातात सहा ठार   

कानपूर : कानपूर देहाटमध्ये अनियंत्रित मोटार खोल नाल्यात पडली. या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांसह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त मोटारीतील आठ जण भिंड येथील टिळक समारंभात सहभागी होऊन त्यांच्या मूळ गावी मुर्रा डेरापूर येथे परतत होते. सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास जगन्नाथपूर गावाजवळून जात असताना मोटार चालकाचे नियंत्रण सुटले आणि मोटार खोल नाल्यात पडली.  स्थानिकांनी मदतकार्य राबवत सर्व जखमींना सार्वजनिक आरोग्य केंद्र सिकंदरा येथे नेले. डॉक्टरांनी विकास (40),  संजय (45), खुशबू (17), गोलू (16), प्राची (12) आणि प्रतीक (10) यांना मृत घोषित केले. विराट आणि वैष्णवी नावाच्या दोन मुलांवर उपचार सुरू आहेत. इतरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Related Articles