बंगळुरू : केंद्र सरकार कर्नाटकवर अन्याय करत आहे. गेल्या चार वर्षांत राज्याचे 45 हजार कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. या अन्यायाविरोधात बुधवारी दिल्लीत राज्यातील काँग्रेस सरकाऱच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. हे आंदोलन भाजप विरोधात नसून केंद्र सरकारच्या अन्यायाविरोधात आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. सिद्धरामय्या यांनी सांगितले की, बुधवारी सर्व मंत्री, खासदार आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सदस्य 15 व्या वित्त आयोगाद्वारे कर्नाटकावर झालेल्या अन्यायाबाबत तसेच राज्याशी संबंधित समस्यांबाबत केंद्र सरकारचा निषेध करणार आहेत.
Fans
Followers