पॅन -आधार जोडणीकडे दुर्लक्ष ६०० कोटी रुपयांचा दंड   

नवी दिल्‍ली : पॅन आणि आधार नोेंदणी जोडणीकडे दुर्लक्ष करणार्‍यांकडून सरकारने 600 कोटींपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे. अजूनही 11 कोटी 48 लाख जणांनी तशी जोडणी केली नसल्याचे उघड झाले आहे. 
 
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लेखी उत्तरात याबाबतची माहिती लोकसभेत सोमवारी दिली. ते म्हणाले, अद्यापि 11 कोटी 48 लाख जणांनी आधार आणि पॅनची जोडणी केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जोडणी न करणार्‍यांकडून सरकारने प्रत्येकी 1 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. त्या संदर्भातील माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर ते बोलत होते. ते म्हणाले, 30 जूून 2023 ही जोडणीसाठी अखेरची मुदत होती. त्यानंतर 1 जुलै 2023 ते 31 जानेवारी 2024 दरम्यान, जोडणीकडे दुर्लक्ष करणार्‍यांकडून 601. 97 कोटींचा दंड वसूल केला आहे. 
 

Related Articles