शेअर बाजारात घसरण   

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टी सोमवारी घसरला. सेन्सेक्स 354 ने घसरून तो 71 हजार 732 वर बंद झाला असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 82 ने घसरून तो 21 हजार 717 वर बंद झाला. टाटा मोटर्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग वाढल्याचे दिसून आले. 
 
दिवसभर सेन्सेक्स कमी जास्त होत होता. सर्वाधिक 72 हजार 385 आणि सर्वात कमी 71 हजार 602 वर पोहोचला होता. बजाज फायनान्स, भारती एअर टेल, मारुती, बजाज फिनर्सिव्ह, एचसीएल. टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर, जेएसडब्लू स्टील, अल्ट्रा टेक सिमेंट, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग घसरले.
 
दरम्यान, टाटा मोटर्सचे समभाग सुमारे 6 टक्के वाढले आहेत. शुक्रवारी कंपनीला दुप्पट म्हणजे 71 हजार कोटींचा नफा झाला होता. डिसेंबरच्या अखेरच्या चौमाहीतील सर्वाधिक नफा ठरला होता. या उलट काल सन फार्मा, पॉवर ग्रिड, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, एनटीपीसी आणि टाटा कन्सल्टन्सीचे समभाग वाढले आहेत. 
 

Related Articles