एकत्रित निवडणुकांना मुख्यमंत्री शिंदे यांचा पाठिंबा   

मुंबई : देशात आणि राज्यात एकत्रित निवडणुका घ्यावात, अशा आशयाचे पत्र शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामनाथ कोविंद यांना लिहिले आहे. केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एक देश एक निवडणुकीसाठी उच्च स्तरीय समिती स्थापन केली आहे.
 
त्या समितीला शिंदे यांनी पत्र लिहिले असून एकत्रित निवडणूक घेण्यास पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले, वारंवार होणार्‍या निवडणुकांमुळे पैसा आणि वेळेचा मोठा अपव्यय होतो.

Related Articles