आमदार गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करा   

शिंदे गटाच्या मंत्र्यांची फडणवीसांकडे मागणी

 
मुंबई, (प्रतिनिधी) : भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामुळे सत्ताधारी शिवसेना भाजपमधील तणाव वाढला आहे. गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले असून, याचे पडसाद सोमवारी उमटले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. गणपत गायकवाड यांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत. भाजपने गायकवाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
 
गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे. विरोधकांच्या हातात यामुळे आयताच मुद्दा मिळाला आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीआधी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर तथ्यहीन आणि बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्याबद्दल आम्ही आमचे मत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडले. हे चुकीचे असून भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली. समन्वय समितीच्या नियमित बैठका होत असतात. पण गेल्या काही दिवसात त्या होऊ शकल्या नाहीत. 
 

Related Articles