E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
फलकांमुळे शहर विद्रूप; राजकीय दबावामुळे कारवाई नाही
Samruddhi Dhayagude
06 Feb 2024
पुणे : शहरातील वातावरण सध्या राजकीय झाले आहे. सभा, सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच लोकसभेची तयारी सुरू झाली आहे. यामुळे मात्र पुण्याचे विद्रुपीकरण होत आहे. राजकीय पक्ष आणि संध्या शहरात सर्रास अनधिकृत बोर्ड, बॅनर लावत आहेत. भाजपकडून तर भिंती रंगवण्याचा उपक्रमच हाती घेण्यात आला आहे. यामुळे शहर विद्रुपीकरणात भर पडत आहे. महापालिका मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असून राजकीय दबाव असल्यामुळे कारवाई करु शकत नसल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे प्रशासकाचा कारभार आल्यानंतर होर्डिंग आणि बॅनरवर मोठी कारवाई केली. अतिक्रमणे काढून टाकली. आता मात्र कारवाईचे नावसुध्दा घेण्यात येत नाही. कारवाई करू अशी केवळ पोकळ भूमिका घेण्यात येत आहे.
लोकसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सगळ्याच राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांचे दौरे वाढले आहेत. यामुळे इच्छुकांकडून त्यांच्या स्वागताचे फ्लेक्स लावले जात आहे. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याचेही फ्लेक्स शहरात वाढले असून, शहराचे विद्रुपीकरणात भर पडत आहे. मात्र याकडे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून बघ्याची भूमिका घेतली जात असून कारवाई करू नये, यासाठी राजकीय दबाब टाकला जात असल्याचे महापालिकेचेच वरिष्ठ अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगत आहेत.
शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण वाढले आहे. त्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तात्परुत्या स्वरुपात कारवाई केली जाते. त्यानंतर परिस्थिती जैसे थे आहे. महापालिकेच्या कर्मचार्यांची पाठ फिरताच पुन्हा अतिक्रमणात भर पडते. ही कारवाई करताना मात्र रस्त्यांवर मोक्याच्या ठिकाणी विविध राजकीय पक्षांकडून होत असलेल्या फ्लेक्सबाजीकडे मात्र आकाश चिन्ह विभागाची डोळेझाक होत केली जात असल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसात विविध राजकीय पक्षांचे दौरे पुण्यात होत आहेत. आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यासह भाजचे नेते देखील सातत्याने पुण्यात येत असल्याने त्यांच्या स्वागताचे फ्लेक्स लावले जात आहे. हे फ्लेक्स काढण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण निरिक्षक गेले असता, फ्लेक्स काढले तर त्याचे परिणाम वाईट होतील अशा धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे फ्लेक्स काढण्याच्या भानगडीतच हे अधिकारी आणि कर्मचारी पडत नसल्याचे दिसून येत आहे.
अतिक्रमण निरीक्षकांवर होणार दंडात्मक कारवाई...
शहरातील चौका-चौकात अनधिकृत फ्लेक्सबाजी, पथारी व्यवसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, अशा अनधिकृत होर्डिंग्स, तसेच पथारी व्यवसायांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. दरम्यान, आता महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अतिक्रमणांवर कारवाई करण्यामध्ये हलगर्जीपणा करणार्या अतिक्रमण निरीक्षकांवर कार्रवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्यांदा टप्प्यात 1 हजार रुपयांचा दंड, तर दुसर्यांदा दोषी आढळल्यास वेतनवाढ रोखण्याचा इशारा विभाग प्रमुखांनी दिला आहे.
शहरात अतिक्रमण वाढल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील अनधिकृत पथारी व्यावसायिकांवर मुख्य विभागाबरोबरच क्षेत्रीय कार्यालय स्तरावरुन कारवाई केली जाते. काही भागात कारवाई होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कारवाईमध्ये टाळाटाळ करण्याच्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. आतापर्यंत कारवाईस दिरंगाई करणार्या दोन अतिक्रमण निरीक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात कारवाई न करणार्या अधिकार्यांवर एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तर दुसर्या टप्प्यात आढळून आल्यास संबंधित अधिकार्यांची वेतनवाढ रोखण्यात येणार आहे. शहरातील अतिक्रमणांवर कार्रवाईस गती देण्यासाठी मनपा प्रशासनाने दोन विभागीय अतिक्रमण निरीक्षकांची नेमणूक केली आहे. यामध्ये झोन एक व दोन साठी एक निरीक्षक, तर झोन 3 व 4 साठी एक निरीक्षक अशी नेमणूक करण्यात आली आहे. यांच्यामार्फत संबंधित विभागामध्ये तपासणी करुन कार्रवाई केली जाईल. तसेच कारवाईचा दैनंदिन अहवाल पाठविला जाईल.
- माधव जगताप, अतिक्रमण विभाग प्रमुख, महापालिका.
Related
Articles
परदेशी पाहुणे पळाले...!
07 Oct 2024
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा
04 Oct 2024
संयुक्त राष्ट्राचे काम जुनाट कंपनीप्रमाणे सुरू
07 Oct 2024
भाजपचे खासदार जिंदाल घोड्यावर स्वार होत मतदान केंद्रात
05 Oct 2024
तीन वर्षांनंतर औद्योगिक उत्पादनात मोठी घट
09 Oct 2024
सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता काळे यांनी जिंकली आर्यमन स्पर्धा
03 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अभिजात’ मराठी (अग्रलेख)
2
इराणला किंमत चुकवावी लागेल
3
स्कूल व्हॅनचालकाचा मुलींवर अत्याचार
4
वाचक लिहितात
5
विकृतीला चाप
6
अटीतटीची लढत (अग्रलेख)