वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठात विविध स्पर्धांचे आयोजन   

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 10 फ्रेबुवारीला 75 वा वर्धापन दिन आहे. या निमित्त विद्यापीठातील विविध विभागांद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्माचार्‍यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. नुकतीच या स्पर्धांची सुरुवात झाली असून या स्पर्धांचे उद्धाटन प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे यांच्या हस्ते करण्यात आले. 
 
विद्यापीठाच्या बहिःशाला विभाग आणि ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षातर्फे निंबध आणि चर्चा परिसंवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धक कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करताना, आपल्या पाल्यांना आयएएस, आयपीएस होण्यासाठी कर्मचार्‍यांनी प्रेरित करावे, त्यासाठी त्यांनी विद्यापीठातील ग्रंथालयाचा उपयोग करावे असे प्रा डॉ. विजय खरे म्हणाले. तर येत्या 8 मार्च म्हणजेच महिला दिनानिमित्त महिला कर्मचार्‍यांसाठी मानसिक आरोग्यावर मार्गदर्शनपर कार्यक्रम घ्यावा, अशा सूचना डॉ. खरे यांनी बहिःशाला विभागाला केल्या. चर्चा परिसंवाद स्पर्धेत प्रत्येकी 3 स्पर्धक असलेले 13 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रा डॉ. सुषमा भोसले, प्रा. डॉ. रूपाली शिंदे आणि डॉ. नागनाथ बळते यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी बहिःशाला विभागाचे संचालक डॉ. हरीश नवले उपस्थित होते.  यासह याच विभागाकडून निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध विभागातील 35 कर्मचारी सहभागी झाले होते. विद्यापीठातील विद्यावाणी या कम्यूनिटी रेडिओतर्फेही ‘रेडिओ सादरीकरण स्पर्धो’ घेण्यात येत आहे. या स्पर्धेच शिक्षकेतर गटातून 42 तर शिक्षक गटातून 8 स्पर्धक सहभागी झाले आहेत. यासह 6 ते 9 फ्रेबुवारी दरम्यान क्रिडा व शारीरिक शिक्षण मंडळातर्फे क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात मिश्र गटासाठी क्रिकेट स्पर्धा तर पुरुष आणि महिला गटांसाठी डॉजबॉल आणि फनी गेम्स या स्पर्धांचा समावेश आहे.
 

Related Articles