सी-डॅकमध्ये जैवमाहितीशास्त्रावर आंतरराष्ट्रीय परिषद   

पुणे : प्रगत संगणन विकास केंद्राच्या (सी-डॅक) वतीने ‘एक्सलरेटिंग बायलॉजी’ या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद आज (मंगळवार)पासून सुरु होत आहे.
 
जगभरातील शास्त्रज्ञांचा सहभाग असलेल्या या परिषदेत जीवशास्त्र, डिजिटल ट्विन्स, अचूक औषध (प्रिसिजन मेडिसिन), मल्टीओमिक्स, सूक्ष्मजीवशास्त्र, एचपीसी आणि क्वांटम कम्प्युटिंग, औषधांचा शोध, आरएनए उपचारशास्त्र, मल्टीस्केल मॉडेलिंग, (संगणकीय आयुर्वेद) कॉम्प्युटेशनल आयुर्वेद, कृषी-जैवविज्ञान (ग्री-बायोसायन्स), जीवशास्त्र आणि औषधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेतील एक्सास्केल कॉम्प्युटिंगच्या क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती सीडॅकचे कार्यकारी संचालक  व  निवृत्त कर्नल ए.के.नाथ यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. राजेंद्र जोशी यावेळी उपस्थित होते. 
 
जैवमाहितीशास्त्र विभागातील परिषदेला भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक प्रा. सुनील भागवत, सुनीता वर्मा आणि ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, सी-डॅकचे महासंचालक ई. मंगेश उपस्थित असणार आहे. परिसंवादाचा एक भाग म्हणून, सी-डॅकच्या वतीने जीवशास्त्रातील संशोधकांसाठी एका सॉफ्टवेअर टूलचे अनावरण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय प्रगत संगणन मोहिमेच्या ‘नॅशनल प्लॅटफॉर्म फॉर जीनोमिक्स अँड ड्रग डिस्कव्हरी’च्या अंतर्गत जीनोमिक्स डेटा विश्लेषण आणि औषधांच्या शोधात मदत करण्यासाठी एक प्रणाली विकसित करण्यात आली असल्याचे नाथ यांनी सांगितले.
 

Related Articles