सीबीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध   

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांच प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आहेत. सर्व शाळा लॉगिन आयडी टाकून त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र डाउनलोड करून वितरित करता येणर आहे. प्रवेशपत्र सीबीएसईच्या ुुु.ललीश.र्सेीं.ळप या अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
 
सर्व शाळांनी सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आणि युजर आयडी आणि पासवर्ड टाकून त्यांच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करावे. यानंतर, शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या प्रवेशपत्रावर शिक्का मारून स्वाक्षरी करून ती विद्यार्थ्यांना द्यावीत. सर्व विद्यार्थी वर्ग शिक्षक किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांकडून शाळेत जाऊन त्यांचे प्रवेशपत्र प्राप्त करता येणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी स्वत: प्रवेशपत्र डाउनलोड करू शकत नाहीत, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
 
विद्यार्थ्याचे  नाव, रोल नंबर, परीक्षेचे नाव, जन्मतारीख, पालकांचे नाव, परीक्षा केंद्राचे नाव आणि इतर माहिती सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रामध्ये  नोंदवले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती काळजीपूर्वक तपासावी आणि त्यात काही त्रुटी आढळल्यास त्यांनी तात्काळ त्यांच्या शाळेशी संपर्क साधावा, असे स आवाहन करण्यात आले आहे. सीबीएसई मंडळाची 15 फेब्रुवारीपासून देशभरात इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा  होणार आहेत. दहावीची परीक्षा 13 मार्चपर्यंत आहेत. तर बारावीचा शेवटचा पेपर 2 एप्रिल रोजी आहे.
 

Related Articles