E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
महाराष्ट्र हे गुंडांचे राज्य
Samruddhi Dhayagude
06 Feb 2024
देवेंद्र फडणवीसांचा गृहमंत्री म्हणून धाक राहिलेला नाही : दानवे
पिंपरी : महाराष्ट्र हे सुसंस्कृत आणि साधनसूचितेची परंपरा असलेले राज्य मानले जात. मात्र आज महाराष्ट्र हे गुंडांचे राज्य झाले आहे, वर्षा आणि सागरवर यांचे बॉस बसले असल्याने ते लोकांना मारतात, जीवघेणे प्रकार करतात, गोळ्या घालतात. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा धाक राहिलेला नाही. ते भाषणे करण्यात आणि राजकारण करण्यात गुंतले आहेत, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
शहर शिवसेनेच्या वतीने आज आकुर्डी येथे अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. भाजपच्या आमदाराने उल्हासनगर येथे पोलीस स्टेशन मध्येच एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यावर गोळ्या झाडल्या. याप्रकरणी शिवसेना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणार का ? असे विचारले असता विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले की भाजपाचे लोक हे गेंड्याच्या कातडीचे आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना हे लोक पराचा कावळा करत होते. आता कोकणातून कोणी म्हणतो की आमचा बॉस सागरवर बसला आहे. कोणी म्हणतो आमचा बॉस वर्षावर आहे. त्यांचे बॉस सागर आणि वर्षावर बसले आहेत, म्हणूनच ते लोकांना गोळ्या घालतात. गृहमंत्री फडणवीस यांचा वचक नाही. काल घाटकोपरमधील चिरागनगर येथे लाठीमार झाला. अश्रुधूर सोडण्यात आला. पोलिसांच्या गाडीच्या काचा फोडल्या.
पोलीस, गृहमंत्री फडणवीस यांचा वचक नसल्याचे हे लक्षण आहे. ते भाषणे करण्यात आणि राजकारण करण्यात गुंतले आहे.असा आरोप दानवे यांनी केला.मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र गुंडाला वर्षा बंगल्यावर भेटतात. आता ते त्याबद्दल काही बोलतील, मात्र वर्षावर कोणालाही येता येत नाही. तपासणी होते. याची आठवण दानवे यांनी करून दिली. उल्हासनगरला गुंडगिरीचा जो प्रकार झाला तो चुकीचा आहे. ज्याने तो प्रकार केला तोही चुकीचा प्रकार आहे आणि ज्याला मारला तोही धुतल्या तांदळासारखा नाही. संपत्ती आणि जमिनीच्या वादातून हे प्रकार होत आहेत, असे दानवे म्हणाले.
पुण्यात गुंडांचे उदात्तीकरण केले जात आहे. एका गुंडाचा खून झाला. त्याचे उदात्तीकरण केले गेले. पोटनिवडणुकांमध्ये गुंडांचा वापर झाला. पेरोलवर सुटलेले किती गुंड होते , पुण्यात कोणत्या हॉटेलमध्ये ते भेटत होते याची चौकशी झाली पाहिजे. सरकारच्या आशीर्वादाने गुन्हेगारांचे उदात्तीकरण चालू आहे. मात्र जनताच एक दिवस याचा निर्णय घेईल, असे दानवे म्हणाले.
खंडण्यांबाबत बोलताना दानवे म्हणाले की ज्यांनी 50 खोकी घेतली त्यांच्याकडे खंडणी विषयीची तक्रार करणे हास्यास्पद आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची असिफ दाढीवाला या गुंडाने भेट घेतल्याबद्दल विचारले असता, दोन पोटनिवडणुकांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचा वावर दिसला, असे दानवे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौर्याला कमी प्रतिसाद मिळत असल्याची टीका विरोधक करत आहेत, त्याबद्दल विचारले असता दानवे म्हणाले की खरेतर हा कार्यकर्त्यांशी संवाद असा उपक्रम होता. संवादाचे रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले. कारण उद्धव ठाकरे यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे, असा दावा दानवे यांनी केला.
मराठा समाजाची फसवणूक करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. मराठा समाजाला फार काही मिळाले आहे असे नाही. मात्र जे काही मिळाले आहे त्यात विष कालवण्याचा प्रयत्न छगन भुजबळ हे करत आहेत. सरकार मराठा आणि ओबीसींना ही चुचकारते आहे. मनोज जरांगे यांच्याकडे चिकाटी आहे. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. मात्र सरकार मराठा समाजाच्या भावनांशी खेळते आहे, असे दानवे म्हणाले. छगन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार का, असे विचारले असता दानवे म्हणाले की छगन भुजबळ यांना एका पक्षाने ऑलरेडी सोडले आहे हे तुम्हाला कळत नाही का असा सवाल त्यांनी केला.
आकुर्डीतील जनता दरबार झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यानंतर त्यांची पत्रकार परिषद स्थायी समिती सभागृहात घेण्याचे नियोजन होते. मात्र महापालिकेचे सभागृह उघडायला शिपाईच आला नाही, असे शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले यांनी पत्रकारांना सांगितले. विरोधी पक्षनेते दानवे यांनी तेथे पत्रकारांशी उभ्या उभ्या संवाद साधला.
Related
Articles
फलटणनगरी भक्तिरसात चिंब
03 Dec 2024
भारत-चीन सीमेवर स्थिती अद्याप पूर्ण सामान्य नाही
04 Dec 2024
स्वयंपाक घरातून शेवगा गायब...
04 Dec 2024
गृह खाते सोरेन यांच्याकडेच राधाकृष्ण किशोर अर्थमंत्री
07 Dec 2024
मराठीच्या अभ्यासू संशोधक डॉ. स्वाती कर्वे यांचे निधन
05 Dec 2024
भारतीय फलंदाजांकडून पुन्हा निराशा
08 Dec 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
समाज परिवर्तनाची सकारात्मक चळवळ
2
आणखी दहा दिवस शेवगा खरेदी विसरा!
3
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उद्या पदवी प्रदान सोहळा
4
मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील
5
’संगीत स्वयंवर’नाट्यप्रयोग पुढील आठवड्यात
6
धुक्यातही रेल्वे सुसाट