नौशाद शेखवर आणखी एक गुन्हा   

पिंपरी : दहावीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या नौशाद अहमद शेख याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला.शेख याच्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 
 
या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याने पीडित मुलीसोबत गैरवर्तन करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तिचा विनयभंग केला. 
 
याबाबत मुलीने भीतीपोटी कोणालाही काही सांगितले नव्हते. दरम्यान, शेख याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार एका अल्पवयीन विद्यार्थिनीने केली.
त्यानुसार 30 जानेवारी रोजी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शेख याला अटक करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी क्रिएटिव्ह अकॅडमी या निवासी शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी चर्चा केली.तसेच त्यांचे समुपदेशन करून गैरप्रकार झाला असल्यास तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यामुळे पीडित विद्यार्थिनीने गैरप्रकार झाल्याचे सांगितले. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Related Articles