रचिन रवींद्रचे विक्रमी द्विशतक   

आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडचा पहिल्या डावात 511 धावांचा डोंगर  

 
माऊंट मौनगानुई ः न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना माऊंट मौनगानुई येथे खेळला जात आहे. या सामन्यात एकदिवसीय विश्‍वचषक 2023 मध्ये आपली छाप पाडणारा युवा फलंदाज रचिन रवींद्रने पहिल्या डावातच द्विशतक झळकावले. कारकिर्दीतील चौथा सामना खेळत असलेल्या रचिनने 366 चेंडूत 240 धावांची उत्कृष्ट खेळी केली. रचिन रवींद्रच्या या दमदार खेळीमुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात 511 धावा करता आल्या. तसेच, रचिन रवींद्रच्या या द्विशतकानंतर त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. सामन्यात दुसर्‍या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या 4 बाद 80 धावा झाल्या होत्या. रचिन रवींद्रने कारकिर्दीतील चौथ्या कसोटी सामन्यात अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत. यादरम्यान त्याने 26 चौकार आणि 3 षटकार मारले. रचिन रवींद्रने कसोटीत 100 धावांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ होती. 

Related Articles