भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला उपांत्य सामना   

अंडर-19 विश्‍वचषक

 
बेनोनी, (दक्षिण आफ्रिका) : उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला भारतीय संघाचा आज (मंगळवारी) यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आयसीसी अंडर-19 विश्‍वचषकाचा उपांत्य फेरीत सामना होणार आहे. हा सामना जिंकून अंतिम सामन्यात धडक मारत विजयाचा प्रबळ दावेदार होण्याचा भारतीय संघाचा मानस असेल. 
 
गतविजेत्या भारताने स्पर्धेतील सलग पाच विजयांच्या जोरावर अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे. भारतीय संघ कोणत्याही विशिष्ट खेळाडूवर अवलंबून राहिला नसून सर्व खेळाडूंनी गरजेनुसार योगदान दिले आहे. फलंदाज धावा करण्यात यशस्वी ठरले, तर प्रतिस्पर्धी संघांना झटपट बाद करण्यात गोलंदाजांना यश आले आहे. भारतीय संघाने चांगल्या फरकाने सामन्यांमध्ये विजय मिळावला आहे. दोन शतके आणि एक अर्धशतकांसह, 18 वर्षीय मुशीर खान सध्याच्या स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये 83.50 च्या सरासरीने 334 धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधार उदय सहारन देखील चांगल्या लयीत असून त्याने 61.60 च्या सरासरीने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 304 धावा केल्या आहेत.  स्वामी कुमार पांडेच्या अचूक गोलंदाजीचा सामना करणे सर्वच प्रतिस्पर्धी संघांना कठीण गेले आहे. त्याने 2.17 च्या इकॉनॉमी रेटने 16 बळी घेतले आहेत.
 

Related Articles