बॉडीबिल्डिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला रौप्य पदक   

विद्यार्थी संकेत काळे देशात दुसरा

 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी संकेत संजय काळे बॉडीबिल्डर स्पर्धेत देशात दुसरा आला आहे. केरळमध्ये झालेल्या ‘ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक मेन चॅम्पियनशिप 2022-23’ या स्पर्धेत रौप्य पदक पटकावत संकेतने उज्वल यश संपादन केले आहे.केरळमधील युनिव्हर्सिटी ऑफ कालिकत येथे ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत देशातील सर्व युनिव्हर्सिटीचे बॉडीबिल्डर सहभागी झाले होते. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यापीठाने पुण्याचे नेतृत्व केले. या स्पर्धेत संकेतने दुसरा नंबर मिळवून शालेय नॅशनल चॅम्पियनशिपवर आपले नाव सुवर्ण अक्षराने नोंदवले आहे. गेल्या वर्षी देखील याच स्पर्धेत संकेतने तिसरा क्रमांक पटकावला होता.
 
या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकार, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, माजी विद्यार्थी संघाचे संचालक प्रा. डॉ. संजय ढोले, माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख प्रा. प्रतीक दामा यांनी संकतेला शुभेच्छा दिल्या. यापूर्वीही इंटरनॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेतही जुनियर भारत श्री होण्याचा मान बॉडीबिल्डर संकेत काळे याने मिळवला आहे.
 

Related Articles