E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
विदेश
होर्मुझमधील क्षेपणास्त्र ठिकाणांवर हल्ले
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
अमेरिकेकडून इराण पुन्हा लक्ष्य
वॉशिंग्टन : अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणच्या क्षेपणास्त्र ठिकाणांवर हल्ले केले आहेत. मध्यावधी निवडणुकीच्या अगोदर एक दिवस केलेली कारवाई मर्यादित स्वरूपाची असल्याचे दिसते, अशी माहिती अमेरिकेच्या एका अधिकार्याने दिली. इराणवरील हल्ल्यानंतर आता पुढे काय होणार ? अशी चिंताही जगभरातून व्यक्त केली जात आहे.
इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ’होर्मुझच्या सामुद्रधुनी’तील केशम आणि हेंगाम बेटांवर, तसेच जवळच्या बंदर अब्बास या मुख्य भूमीवरील भागात हल्ल्यानंतर स्फोटांचे आवाज ऐकू आले. अमेरिकेकडून मात्र,या हल्ल्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती, असे सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
मध्यावधी निवडणुकांपूर्वी इराणवर हल्ले करणार नाही. असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते. मात्र, हल्ले केल्यामुळे त्यांचे विधान खोटे ठरले आहे. ते सांगतात एक आणि करतात दुसरे हे पुन्हा स्पष्ट झाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीत जेथून अमेरिका आणि संबंधित मित्र देशांवर जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे वापरली जात होती. तेथे हल्ले केले आहेत. दरम्यान, इराणने होर्मुझ जलमार्ग पुन्हा खुला करण्यासाठी दोन दिवसांची योजना आखल्याचे जाहीर केले होते. तसेच अणुविषयक चर्चा अमेरिकेसोबत पुन्हा सुरू करण्याची तयारीही दाखवली होती. यानंतर अमेरिकेने हवाई हल्ले करुन होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचे वर्चस्व कमी करण्यासाठी पावले टाकली आहेत.
ट्रम्प यांनी भूमिका बदलली
होर्मुझची नाकेबंदी करुन खनिज तेल आणि वायूचा पुरवठा रोखला आहे. पुरवठ्याची साखळी तुटल्यामुळे इंधनाचे दर वाढले आहेत. त्याचा फटका अमेरिकेसह जगाला बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर तो मार्ग खुला करावा, असा दबाव डोनाल्ड ट्रम्प याच्यावर त्यांचे आखाती मित्र देश आणि युरोपीय देशांकडून वाढला होता. मात्र मध्यावधी निवडणुकांमुळे ट्रम्प यांनी चांगला आणि सभ्य व्यक्ती अशी प्रतिमा मतदारांसमोर निर्माण करण्यासाठी इराणविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. तसेच विविध देशांवर आयात शुल्कही लादले नाही.. आता मात्र मतदान सुरु होताच त्यांनी आपले हात मोकळे केल्याचे मानले जात आहे.
Related
Articles
भाजपच्या गुंडांकडून मध्यरात्री निवासस्थानावर हल्ला
08 Nov 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये दिवाळीच्या आतषबाजीमुळे आगीच्या ७६ घटना
13 Nov 2026
लक्ष्मीपूजनाच्या साहित्याने बाजारपेठ सजली
08 Nov 2026
गुरूवार पेठेतील जुना भंडारीवाडा फटाक्याच्या आगीत जळून खाक
13 Nov 2026
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आखाड्यात राजकीय संघर्ष अटळ !
11 Nov 2026
जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन संशयिताना अटक
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
2
स्वच्छ विनोदाचा बादशहा
3
॥ महालक्ष्मींच विद्महे ॥
4
संकट समुद्रात, परीक्षा जमिनीवर
5
शेअर बाजाराची कोंडी
6
शेख हसीना परतणार? (अग्रलेख)