E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भालाफेकीत भारताची चमकदार कामगिरी यशवीरला रौप्य, रोहितला कांस्य
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताने भालाफेकीत रौप्य आणि कांस्य अशी दोन पदके जिंकली. यशवीर सिंहने ८५.७२ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत रौप्यपदक पटकावले, तर रोहित यादवने ८४.३५ मीटर भालाफेक करत कांस्यपदक मिळवले.
अॅथलेटिक्समध्ये मुरली श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडीत ८.०७ मीटरची उडी घेत रौप्यपदक जिंकले. गुलवीर सिंहने पुरुषांच्या १५०० मीटर शर्यतीत ३ मिनिटे ३६.७२ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले. पारुल चौधरीने महिलांच्या ५००० मीटरमध्ये १५ मिनिटे १४.६१ सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले.
विथ्या रामराजने महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत ५४.७५ सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदकासह राष्ट्रीय विक्रम मोडला. यापूर्वी हा विक्रम पी.टी. उषा यांच्या नावावर होता.
शूटिंगमध्ये ईशा सिंहने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक जिंकले. नवव्या दिवशी भारताने आठ पदकांची कमाई केली. भारताच्या खात्यात आता ४ सुवर्ण, २० रौप्य आणि २१ कांस्य अशी एकूण ४५ पदके आहेत.
Related
Articles
कात्रज-कोंढवा रस्त्यावर रात्रभर पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट
08 Oct 2026
सोलापुरात ई-बस सेवेला वेग
05 Oct 2026
’सत्याग्रह’ व्यासपीठावर ३० हजार निदर्शनांची नोंद
06 Oct 2026
पोटेगाव बंधार्याच्या दुरुस्तीवरून शेतकरी संतप्त
05 Oct 2026
तब्बल दहा वर्ष तरूण कोठडीत आरोपी म्हणून जगला!
05 Oct 2026
पृथ्वी शॉ महाराष्ट्राचा कर्णधार; रणजीत नेतृत्वाची धुरा
06 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
आयोगाने विश्वासार्हता गमावली
5
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान