E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
लक्ष्य सेनकडे भारतीय आव्हानाची धुरा
Wrutuja pandharpure
01 Sep 2026
चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा
शेनझेन
: जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुरुवातीलाच गाशा गुंडाळावा लागलेल्या लक्ष्य सेनकडे आता ती निराशा मागे टाकून मंगळवारपासून येथे सुरू होणार्या 12 लाख 50 हजार अमेरिकन डॉलर बक्षीस रकमेच्या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय आव्हानाची धुरा असेल.मात्र, लक्ष्यला पहिल्याच फेरीत कठीण आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. त्याची सलामीची लढत फ्रान्सचा विश्वविजेता अॅलेक्स लॅनियर याच्याशी होईल. जूनमध्ये यूएस ओपन सुपर 300 स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा किदाम्बी श्रीकांत पहिल्या सामन्यात चायनीज तैपेईच्या ची यू-जेनचा सामना करेल. या मोसमात त्याची कामगिरी चढ-उताराची राहिली आहे. कॅनडा ओपनमध्ये दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर कोरिया मास्टर्समध्येही तो पहिल्याच फेरीत पराभूत झाला.
पुरुष दुहेरीत भारताला चौथ्या मानांकित सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीकडून मोठ्या अपेक्षा असतील. सात्विक आणि चिराग यांनी यावर्षीच्या सुरुवातीला सिंगापूर ओपनचे विजेतेपद पटकावून तब्बल दोन वर्षांचा आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचा दुष्काळ संपविला. त्यांचा पहिला सामना चीनच्या हू के युआन आणि लिन जियांग यी या जोडीशी होईल. महिला एकेरीत भारताची भिस्त उन्नती हुडा, तन्वी शर्मा आणि देविका सिहाग या तीन युवा खेळाडूंवर असेल.रोहतकची 18 वर्षीय उन्नती पाचव्या मानांकित चीनच्या हान यू हिच्याशी भिडेल. तन्वीचा सामना डेन्मार्कच्या अमाली शुल्जशी, तर देविकाचा मुकाबला बल्गेरियाच्या कालोयाना नलबंतोवा हिच्याशी होईल. इतर सामन्यांमध्ये पुरुष दुहेरीत हरिहरन आमसकारुनन आणि एम. आर. अर्जुन या भारतीय जोडीसमोर आठव्या मानांकित जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी या जोडीचे आव्हान असेल. होकी आणि कोबायाशी ही जोडी 2021 ची विश्वविजेती आहे.
Related
Articles
मुक्ताबाई यात्रेत रंगला कलगी-तुर्याचा सामना
13 Sep 2026
एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने संपवले जीवन
10 Sep 2026
सोलापूर मंडळात महिभरात ७२ लाख ११ हजार युनिट सौर ऊर्जा निर्मिती
09 Sep 2026
पिंपरीत फ्युजन मोदक लोकप्रिय; ‘शुगर-फ्री’ मोदकही उपलब्ध
15 Sep 2026
वाचक लिहितात
09 Sep 2026
सिकंदराबाद लष्करी शस्त्रागारातून रायफल-पिस्तुलांची चोरी
12 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
2
दीर्घकाल विभक्त जोडप्यांचे घटस्फोट योग्यच
3
जीवन उन्नत बनवणारे शिक्षण हवे
4
बांगला देशी महिलांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई देण्याचे आदेश
5
विद्यार्थ्यांचा आक्रोश (अग्रलेख)
6
निराधार मुलांना सरकारचा आधार