मजुरांच्या सुटकेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा   

उत्तरकाशी : उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी डोंगराच्या माथ्यावरून आणि इतर बाजूने खोदले जाणार आहे. उभ्या ड्रिलिंगसाठी चार ठिकाणे ठरवण्यात आली आहेत, तेथे पोहोचण्यासाठी ट्रॅक बांधण्याचे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडे सोपवण्यात आले आहे. 
 
परदेशी तज्ज्ञांच्या मदतीने केंद्र आणि राज्यातील सहा पथके काल दुपारपासून हे काम सुरू केले आहे. इंदूरहून आणलेले तिसरे आधुनिक ऑगर मशीन घटनास्थळी पोहोचले आहे. बोगदा बनवणारी सरकारी कंपनी नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.ने एकूण 41 मजूर आतमध्ये अडकले असल्याचे म्हटले आहे. गेल्या रविवारी ब्रह्मकमळ-यमनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यरा आणि दंडलगाव दरम्यानचा बोगदा अचानक कोसळला. त्यामध्ये 40 हून अधिक कामगार अडकले आहेत. 
 

Related Articles