अमली पदार्थांची विक्री करणार्‍या टोळीस गुवाहाटी पोलिसांकडून अटक   

गुवाहाटी : गुवाहाटी पोलिसांनी आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन महिलांसह पाच चोरटा व्यापार करणार्‍यांना अटक केली आहे. आरोपींकडून अंदाजे अडीच कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेच्या अधिकार्‍याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली असून, जो मुख्य आरोपी आहे, तो ड्रग्जचा चोरटा व्यापार करायचा.
 

दोन महिलांसह पाच जणांना अटक

 
गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दिगंत बराह म्हणाले, शनिवारी रात्री शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. यावेळी त्यांनी दोन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे.
 
पहिल्या कारवाईत मणिपूरमधील तीन ड्रगचा चोरटा व्यापार करणार्‍यांना अटक करण्यात आली आहे. तर नंतर दोघांना इंफाळ पश्चिम आणि एकाला सेनापती जिल्ह्यातून अटक केली आहे. या कारवाईदरम्यान त्यांच्या पथकाने हेरॉईनने भरलेले 24 साबणाचे बॉक्स जप्त केले. ज्याचे वजन सुमारे 280 ग्रॅम होते. याबाबतची चौकशी सुरू असून, आवश्यक ती कारवाई केली जाईल. असे पोलीस आयुक्त दिगंत बराह यांनी सांगितले. दरम्यान, अन्य एका प्रकरणात गुवाहाटी पोलिसांनी पश्चिम जिल्ह्यातून एका व्यक्तीला अटक केली आहे. तो मणिपूरच्या दोन महिला ज्या ड्रग्जचा चोरटा व्यापार करत होत्या. त्यांच्याकडे तो हेरॉइनची पाकिटे खरेदी करण्यासाठी आला असताना त्याला अटक करण्यात आली.
 

Related Articles