रशियातील सैबेरियामध्ये वादळामुळे दोन जणांचा मृत्यू   

मॉस्को : रशियातील सैबेरियामध्ये जोरदार वादळामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. रविवारी रशियाच्या सायबेरियात अनेक भागात 38 मीटर प्रतिसेकंद वेगाने आलेल्या वार्‍यांमुळे एका गाडीवर झाड पडल्याने त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.रशियन शहरातील नोवोकुझनेत्स्कमध्ये झाडे पडल्याने आणखी दोन जणांना  रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे एका प्रादेशिक अधिकार्‍याने सांगितले.
 

शाळांना सुट्टी 

 
नोवोकुझनेत्स्कचे प्रमुख सर्गेई कुझनेत्सोव्ह म्हणाले, जोरदार वार्‍यामुळे वीजवाहिन्या आणि इमारतींचे नुकसान झाल्यानंतर शहरात आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली आहे. स्थानिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.   
 
रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, वार्‍यांमुळे केमेरोवो, क्रास्नोयार्स्क, नोवोसिबिर्स्क आणि ओम्स्क प्रदेश, अल्ताई क्राय, अल्ताई रिपब्लिक, खाकासिया रिपब्लिकमध्ये नुकसान झाले आहे.
 

Related Articles