दिवाळीच्या सात दिवसांत ५ हजार ३१३ वाहनांची आरटीओकडे नोंदणी   

पिंपरी : उद्योगनगरीतील नागरिकांनी दिवाळीनिमित्त जोरदार वाहन खरेदी केली आहे. दिवाळीच्या 7 दिवसांत तब्बल 5 हजार 313 वाहनांची आरटीओकडे नोंदणी झाली आहे. यामधून पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाला 29 कोटी 86 लाख 87 हजार रूपयांचा महसूल मिळाला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.
 
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आधीपासूनच वाहन बुकिंग करून ठेवतात. अवघ्या 7 दिवसांत पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे 5 हजार 313 वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 3 हजार 105 दुचाकी, 1 हजार 798 कार, तर इतर 410 वाहनांचा समावेश आहे. बुकिंग करून झाल्यावर दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहक वाहने शोरूममधून आपापल्या घरी घेऊन गेले आहेत. सर्वच वाहनांची यावर्षी खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. झीरो किंवा कमीत कमी डाउनपेंमेट, कर्ज योजना, आकर्षक इएमआय या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. वाढत्या इंधन दरवाढीमुळे ई-व्हेईकलची विक्री वाढली आहे. 
 
गतवर्षी दिवाळीत 4 हजार 516 वाहनांची नोंदणी आरटीओकडे झाली होती. यामधून 23 कोटी 16 लाखांचा महसूल मिळाला होता. यंदा दिवाळीत 5 हजार 313 वाहनांची नोंदणी झाली आहे. यामधून 29 कोटी 86 लाख 87 हजार रूपयांचा महसूल मिळाला असल्याचे पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले.
 

Related Articles