विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी परिक्षा पुढे ढकलली   

फरिदाबाद : आयसीसी एकदिवसाच्या विश्‍वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. हा सामना जिंकून भारतीय संघाला तिसर्‍यांदा एकदिवसाचा विश्‍वचषक जिंकण्याची संधी आहे. हा सामना पाहण्यासाठी देशभरातील लोक आतूर झाले आहेत. खरं तर, भारतीयांना क्रिकेटच किती वेड आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कारण कालचा हा फायनल सामना पाहण्यासाठी लोकांनी आठवडाभर आधीच प्लॅनिंग केल्याचं आपण पाहिलं आहे. या संबंधित अनेक मीम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होती. 
 
अशातच आता फरिदाबादमधील एका घटनेमुळे भारतात क्रिकेटची क्रेझ किती मोठ्या प्रमाणात आहे याचं उदाहरण पाहायला मिळत आहे. हो कारण येथील एका शाळेतील 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा विश्वचषक 2023 चा फायनल सामन्यासाठी पुढे ढकलली आहे. तर ही घटना समजताच अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, फरीदाबादमधील डीएवी पब्लिक स्कूलने भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय विश्वचषक 2023 फायनलमुळे इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी युनिट टेस्ट पुढे ढकलली आहे. शाळेने यासाठी काढलेल्या आदेशाच्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.एका नेटकर्‍याने या फोटोवर कमेंट करताना लिहिलं, ‘क्रिकेट हा भारतातील एक सण आहे,’तर दुसर्‍याने लिहिलं, हीच खरी क्रिकेटची क्रेझ आहे. तर तिसर्‍याने लिहिलं, शाळा व्यवस्थापनाला सलाम. तर काही नेटकर्‍यांनी शाळेचा मुख्याध्यापक क्रिकेटचा मोठा चाहता असू शकतो असं लिहिलं आहे. शाळेच्या या आदेशाचा फोटो एक्स (ट्विटर) वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याखालील मजेशीर कमेंट वाचून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे.
 

Related Articles