E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
विश्वचषक जिंकल्याचा संपुर्ण संघाला आनंद : पॅट कमिन्स
Samruddhi Dhayagude
20 Nov 2023
अहमदाबाद : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियावर कांगारू भारी पडले. 6 फलंदाज राखुन भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला. आम्हाला विश्वचषक जिंकल्याने आनंद झाला असे मत कमिन्सने मांडले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने आपल्याकडून याच पद्धतीचा खेळ खेळला जाणार असल्याची पूर्वकल्पना दिली होती. भारतात सामना असल्याने स्टेडियममध्ये भारतीय चाहतेच जास्त असणार आहेत. अंदाजे 1 लाख 30 हजार लोक भारताचा जयघोष करत असतील याची आम्हाला कल्पना आहे पण हे आम्ही स्वीकारले आहे. आणि खरंतर अशा एकतर्फी सामन्यातच स्टेडियममधील चाहत्यांना शांत करण्याची आणि विश्वचषक जिंकण्याची गंमत काही औरच असते. अशा आशयाची प्रतिक्रिया पॅट कमिन्सने दिली होती.
कमिन्स म्हणाला की, इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळल्यानंतर, पाचवेळा चॅम्पियन असलेला ऑस्ट्रेलिया संघ भारतीयांच्या क्रिकेटप्रेमाला ओळखून आहे. मोठ्या गर्दीसमोर खेळणे ही सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघातील अनेकांसाठी नवी गोष्ट नाही. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि ग्लेन मॅक्सवेल हे सर्व 2015 च्या अंतिममध्ये होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाने 80 हजारहून अधिक चाहत्यांसमोर न्यूझीलंडचा पराभव केला होता. संघातील बरेच जण आयपीएलही खेळले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या तयारीविषयी बोलताना पॅट कमिन्स म्हणाला होता की, एक गोष्ट जी सातत्यपूर्ण राहिली ती म्हणजे संघाचे मनोबल. सर्वच आशावादी होते. प्रत्येक जण खेळासाठी तयार आहे. हा सामना आमच्या सर्वांच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो, जेव्हा मागे वळून कालच्या सामन्याकडे पाहू तेव्हा अभिमान वाटू शकतो. नेदरलँड्सविरुद्ध, सामना वगळल्यास आम्हाला कोणतेही मोठे विजय मिळालेले नाहीत. आम्हाला विजय गवसताना खूप अडचणी आल्या पण विजयी कसे व्हायचे हे आम्ही ओळखले आहे. प्रत्येक विजयासाठी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा खेळाडू संघासाठी उत्तम कामगिरी करताना दिसला आहे. दरम्यान, सहा आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाने भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करून विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली होती.
Related
Articles
भाजप नेते करण देव कंबोज काँग्रेसमध्ये
14 Sep 2024
केनियात धर्मगुरूकडून अनुयायांची सामूहिक हत्या
16 Sep 2024
मेक्सिकोत दुर्गंधीयुक्त पाणी लोकवस्तीत नागरिकांचा जगण्यासाठी प्रचंड संघर्ष
17 Sep 2024
दिल्लीत व्यायामशाळेच्या मालकाची गोळीबारात हत्या
14 Sep 2024
मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मावळली
17 Sep 2024
हिमनदी वितळल्याने भूकंपाचे धक्के !
14 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
सोने झळाळणार, वाहनांची घसरण
4
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
5
वाचक लिहितात
6
वाचक लिहितात